Gang Rape In Delhi : 2012 साली दिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला होता. दहा वर्षानंतर पुन्हा एकदा तशीच भयानक घटना घडली आहे. दिल्ली पुन्हा एकदा सामूहिक बलात्काराने हादरली आहे. धावत्या कार मध्ये(running car) एका तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला आहे. नराधमांनी या तरुणीवर बलात्कार करुन तिला हायवेवर फेकून दिले. देशातील सर्वात मोठा हाय वे असलेल्या युमना एक्सप्रेस हाय वे (Yumna Express Highway) वर तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला आहे(Crime News).
पीडित तरुणी ही आगरा येथील राहणारी आहे. पीडित तरुणी रात्रीच्या वेळी घरी निघाली होती. नोएडा येथून तिने शेअर टॅक्सी पडकली. नोएडा येथून आगरा येथे निघालेल्या या शेअर टॅक्सीत तिच्यासह आणखी दोन प्रवासी होते. टॅक्सी हायवेवर आल्यावर या दोन सह प्रवाशांसह ड्रायवरने या तरुणीवर धावत्या कारमध्येच बलात्कार केला. तरुणीने यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे नराधम थांबले नाहीत. आळीपाळीने या नराधमांनी तिच्यावर अत्याचार केला. तरुणी बचावासाठी आरडा ओरडा करत राहिली. मात्र, टॅक्सी सुसाट पळत असल्याने या तरुणीला मदत मिळाली नाही. या नराधमांनी बलत्कार केल्यावर तरुणीला धावत्या टॅक्सीतूनच हाय वेवर फेकून दिले.
धावत्या टॅक्सीतून बाहरे फेकली गेल्यामुळे ही तरुणी यात गंभीर जखमी झाली. जखमी अवस्थेत तिने पोलिस ठाणे गाठले आणि घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी CCTV फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरु केला. CCTV फुटेजच्या आधारी टॅक्सी नंबर शोधून पोलिसांनी काही तासांतच आरोपींना गजाआड केले. तरुणवर बलात्कार करणाऱ्या तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षतेबाबत देखील प्रश्नचिन्हा उपस्थित झाले आहे. हायवेवर पोलिसांचे पेट्रोलिंग नसते का? ही टॅक्सी टोल प्लाजाजवळ देखील थांबली होती. यावेळी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना या टॅक्सीमधून काही संशयास्पद हालचाली दिसून आल्या नाहीत का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
16 डिसेंबर 2012 रोजी धावत्या बसमध्ये एका तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला होता. निर्भयावर झालेल्या या अत्याचारामुळे संपूर्ण देश हादरला. बलात्कारानंतर पीडितेचा अत्यंत क्रूर पद्धतीने लैंगिक छळ करण्यात आला. नराधमांनी तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड घुसवला होता. या अत्याचारामुळे निर्भयाच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या होत्या. त्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना निर्भयाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर देशात संतापाची लाट उसळली होती.