खरंच इतक्या स्वस्त मिळायची Bullet Bike, जुने बिलं पाहून नेटकऱ्यांना बसला धक्का

Viral Story : सोशल मीडियावर गेल्या अनेक महिन्यांपासून जून्या गोष्टींचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. यामध्ये मध्यंतरी 1985 चे रेस्टॉरंट बिल आणि 1937 चे सायकलचे बिल सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. जुन्या बिलातील वस्तुंची रक्कम पाहून अनेकांना ते जुने दिवस आठवले होते.

Updated: Dec 28, 2022, 07:15 PM IST
खरंच इतक्या स्वस्त मिळायची Bullet Bike, जुने बिलं पाहून नेटकऱ्यांना बसला धक्का title=

Viral Story : सोशल मीडियावर दररोज अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. या माध्यमातून नेटकऱ्यांचे तुफान मनोरंजन होत असते. तर काही बाबतीत अनेकांना आश्चर्याचा धक्काही बसत असतो. असाच धक्का देणारा फोटो आता समोर आला आहे.या फोटोत जुन्या बुलटे बाईकचा (Royal Enfield Bullet) फोटो दिसत आहे. या फोटोसह बिलाचा फोटो देखील आहे. या बिलातील बाईकची रक्कम पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. दरम्यान सध्या हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोची सोशल मीडियावर चर्चा आहे. 

सोशल मीडियावर गेल्या अनेक महिन्यांपासून जून्या गोष्टींचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. यामध्ये मध्यंतरी 1985 चे रेस्टॉरंट बिल आणि 1937 चे सायकलचे बिल सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. जुन्या बिलातील वस्तुंची रक्कम पाहून अनेकांना ते जुने दिवस आठवले होते. तसेच अनेकांनी या गोष्टीला अनुसरून स्वत:ची एक आठवण देखील सांगितली होती. 

फोटोत काय? 

आता असाच एक जुना फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत एका जुन्या बुलेट बाईकचं (Royal Enfield Bullet) चित्र आहे. तर या बाईकसोबत त्याचे बिल देखील आहे. या बिलातील बुलेटची रक्कम पाहून अनेकांना धक्का बसला आहे. कारण आताच्या घडीला मिळणाऱ्या बुलेटची किंमत आणि जुन्या काळी मिळणाऱ्या बुलेटची किंमत यात खुप मोठी तफावत आहे. त्यामुळे या बिलावरील बुलेटची किंमत पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. 

जुन्या बुलेटची किंमत किती?  

सध्याच्या घडीला बुलेट असणे एक स्टेटस सिम्बॉल झाले आहे. कारण ज्या व्यक्तीकडे बुलेट असते, तो खुप श्रीमंत व्यक्ती असतो, असा एक समज झाला आहे. त्यामुळे अनेक जण बुलेट स्टेटस सिम्बॉलसाठी (Royal Enfield Bullet) घेतायत. मात्र आताच्या घडीला या बुलेटची किंमत दीड लाखाच्या घरात आहे. जी आता सामान्यांना परवडणे खुपच अवघड झाले आहे. पण, एक काळ असा होता की त्याची किंमत फक्त 19 हजार रुपये होतीच. म्हणजे आताचा तुलनेत एखादा स्मार्टफोन घेता येईल इतक्या स्वस्तात त्या काळी बुलेट मिळायची आहे. त्यामुळे नेटकऱ्यांना ते जूने दिवस आठवतायत.  

किती जुने बिल आहे?

सोशल मीडियावर व्हायरल झालेले हे बिल 23 जानेवारी 1986 चे आहे, जे सध्या कोठारी मार्केट, झारखंड येथे असलेल्या अधिकृत डीलरचे असल्याची माहिती आहे. या बिलानुसार, त्यावेळी 350 सीसी बुलेट मोटरसायकलची (Royal Enfield Bullet) ऑन-रोड किंमत 18 हजार 800 रुपये होती, जी सूट मिळाल्यानंतर 18 हजार 700 रुपयांना विकली गेली. मात्र सध्या 'बुलेट 350 सीसी' बाईकची किंमत पाहिलीत तर ती 1.60 लाख रुपयाच्या घरात आहे. त्यामुळे दोन्ही काळात आणि बाईकच्या किंमतीत खुप फरक होता. 

बिलासह बुलेटचा (Royal Enfield Bullet) हा फोटो 13 डिसेंबर रोजी इंस्टाग्राम पेज रॉयन इनफिल्ड 4567k वरून पोस्ट करण्यात आला होता. या फोटोच्या कॅप्शनला, रॉयल इन फिल्ड 350 सीसी 1986 असे लिहण्यात आले आहे. या पोस्टला आतापर्यंत 22 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच या फोटोवर नेटकऱ्यांकडून भन्नाट कमेंटस येत आहेत. एका युझरने लिहिले की, माझी बाईक एका महिन्यात इतके तेल वापरते. तर दुसऱ्या युझरने, आज इतक्या बुलेटचा एक महिन्याचा हप्ता असल्याचे नमुद केले होते. सध्या हा फोटो तुफान व्हायरल होत आहे. या फोटोची सोशल मीडियावर चर्चा आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x