ड्रायविंग लायसन्सला आधार कार्डाशी जोडणं अनिवार्य

वाहतुकीचे काही नियम 

ड्रायविंग लायसन्सला आधार कार्डाशी जोडणं अनिवार्य  title=

मुंबई : केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितल्याप्रमाणे,'सरकार लवकरच ड्रायव्हिंग लायसन्सला आधार कार्डाशी जोडणं बंधनकारक करणार आहे.' 'आम्ही लवकरच असा एक कायदा आणणार आहो ज्यामध्ये ड्रायविंग लायसन्स आधार कार्डाशी जोडणं अतिशय महत्वाचं असणार आहे.'

हे असं करण्याच महत्वाचं कारण म्हणजे, दुर्घटना झाल्यावर दोषी व्यक्ती घटनास्थळावरून पळ काढतो आणि ड्युप्लीकेट ड्रायविंग लायसन्स मिळवत. यामुळे तो व्यक्ती शिक्षेपासून वाचतो. 

जर आधार कार्ड आणि ड्रायविंग लायसन्स लिंक झाले तर, जरी तुम्ही आपलं नाव बदललं तरी बायोमॅट्रीक्स बदलू शकत नाही. त्यामुळे जेव्हाही ड्युप्लीकेट लायसन्ससाठी ती व्यक्ती अर्ज भरेल तेव्हा लक्षात येईल की ड्रायविंग लायसन्स अगोदर आहे. त्यामुळे त्या व्यक्ती नवं ड्रायविंग लायसन्स मिळणार नाही. 

केंद्र सरकारच्या 'डिजिटल इंडिया' या उपक्रमाची प्रशंसा करताना मंत्री म्हणाले की, 'शहरी आणि ग्रामीण भागातील अंतर आता कमी झालं आहे.' तसेच 123 करोड आधार कार्ड तयार केले आहेत. 121 करोड मोबाइल फोन असून त्यामध्ये 44.6 करोड स्मार्ट फोन आहेत. 56 करोड लोकं इंटरनेटचा वापर करत आहेत. 

जाणून घ्या वाहतूकीचे काही नियम 

'चलान' हा शब्द प्रत्येकालाच माहित आहे. ट्रॅफिक पोलीस नियम तोडल्यानंतर पकडतात आणि त्याचवेळी चलान कापतात. चलनाचे पैसे त्याचवेळी जमा करावे लागतात. अशावेळी ट्रॅफिक पोलिसांकडून पावती घेणं विसरू नका. 

जर तुमच्याकडे त्यावेळी पैसे नसतील तर ट्रॅफिक पोलीस तुमचं लायसन्स घेऊन तुम्हाला चलान देईल. मग ते चलान घेऊन तुम्हाला कोर्टात जाऊन दंड भरून आपलं लायसन्स घेऊन यायचं आहे.