Aadhaar Update: ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! आधार अपडेटसाठी नवीन सेवा सुरू, UIDAI कडून माहिती

आता तुम्हाला कोणत्याही आधार केंद्रावर जाऊन तुमचा वेळ वाया घालवण्याची गरज नाही.

Updated: Feb 25, 2022, 04:31 PM IST
Aadhaar Update: ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! आधार अपडेटसाठी नवीन सेवा सुरू, UIDAI कडून माहिती title=

मुंबई : आता भारतामध्ये आधार कार्ड एक आवश्यक कागदपत्र बनले आहे. तसेच आधार कार्ड हा केवळ ओळखीचा पुरावा नाही तर अनेक सरकारी आणि नॉन सरकारी लाभांसाठी देखील हा एक अनिवार्य कागदपत्र आहे. आधार कार्ड एक अद्वितीय दस्तऐवज आहे, कारण त्यात त्या व्यक्तीची आवश्यक माहिती असते. मुलांच्या प्रवेशापासून ते सरकारी अर्ज भरेपर्यंत सर्वच ठिकाणी आधारकार्डचा वापर केला जातो.

आधार कार्ड सहज अपडेट करा

बर्याचदा लोकांना त्यांच्या आधाराशी संबंधीत माहिती, जसे की, नंबर, नाव, पत्ता असं काही बदलायचं असतं, ज्यासाठी त्यांना अधार केंद्रावर जावं लागतं. परंतु यामुळे लोकांचा फार वेळ वाया जातो. परंतु आता तुम्हाला कोणत्याही आधार केंद्रावर जाऊन तुमचा वेळ वाया घालवण्याची गरज नाही. तुम्ही आता घरबसल्या ऑनलाईन तुमची अपॉंटमेंट बुक करु शकता, ज्यामुळे तेथे जाऊन रांगेत उभं राहून तुमचा वेळ वाया जाणार नाही.

आत आधार अपडेटसाठी अपॉइंटमेंट कशी घ्यायची याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही ऑनलाईन कोणकोणत्या गोष्टींसाठी आपली नोंदणी करु शकता याबद्दल जाणून घ्या

- नवीन आधार नोंदणी
- नाव अपडेट
- पत्ता अपडेट
- मोबाईल नंबर अपडेट
- ईमेल आयडी अपडेट
- जन्मतारीख अपडेट
- लिंग अपडेट
- बायोमेट्रिक अपडेट्स

ऑनलाइन अपॉंटमेंटचे वेळापत्रक

- https://uidai.gov.in/ वर जा.
- My Aadhaar वर क्लिक करा आणि अपॉइंटमेंट बुक करा.
-आधार सेवा केंद्रांवर बुक अपॉइंटमेंट निवडा.
- ड्रॉपडाउनमध्ये तुमचे शहर आणि स्थान निवडा.
- अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी Proceed वर क्लिक करा.
-मोबाईल नंबर एंटर करा, 'नवीन आधार' किंवा 'आधार अपडेट' टॅबवर क्लिक करा.
-कॅप्चा एंटर करा आणि जनरेट OTP वर क्लिक करा.OTP टाका आणि Verify वर क्लिक करा.
-पुराव्यासह वैयक्तिक तपशील आणि पत्ता तपशील प्रविष्ट करा.
-टाइम स्लॉट निवडा आणि Next वर क्लिक करा.
-असे केल्याने तुमची अपॉंटमेंट तुम्हाला मिळेल.

(https://appointments.uidai.gov.in/(X(1)S(eoi1to45la2x2jnwez1y1aq4))/bookappointment.aspx?AspxAutoDetectCookieSupport=1)