Aadhaar Card वरचा फोटो बदलणं सहज शक्य... कसं ते जाणून घ्या

आधारकार्डवरचा तुमचा फोटो तुम्हाला बदलायचा का? मग काय करायचं जाणून घ्या ही सोपी पद्धत

Updated: Oct 22, 2021, 10:25 PM IST
Aadhaar Card वरचा फोटो बदलणं सहज शक्य... कसं ते जाणून घ्या

मुंबई: आधार कार्डवर ज्याचा फोटो चांगला येईल तो खरा भाग्यवान असं मजेत म्हटलं जातं. इतके वाईट फोटो या आधारकार्डवर येतात. आधार कार्ड हा देशातील प्रत्येक नागरिकासाठी सर्वात महत्त्वाचा ओळख पत्र किंवा पुरावा म्हणून मानला जातो. प्रत्येक कामासाठी आधारकार्ड आवश्यक असतं. काहीवेळा आधारकार्डवरचा फोटो बदलण्याची गरज असते. त्यावेळी नेमकं काय करायचं असा प्रश्न पडतो. आज त्याच संदर्भात आपण जाणून घेणार आहोत. 

आजच्या काळात आधार कार्ड हा देशील प्रत्येक नागरिकाची साथ सर्वार्थ महत्वाकांक्षी ओखळपत्र बनलं आहे. अगदी बँक खात्यापासून ते तहसिल कार्यालय आणि खासगी कामापासून ते सरकारी योजनेपर्यंत आधार महत्त्वाचं झालं आहे. अनेकांना आधार कार्डवरील फोटो आवडत नाही.

तुम्हाला जर तुमच्या आधार कार्डवरील फोटो बदलायचा असेल तर तो तुम्ही बदलू शकता. कारण आधार कार्डमधील फोटो बदलण्यासाठी कोणतीही ऑनलाईन प्रक्रिया नाही आणि तुम्ही जवळच्या आधार नावनोंदणी केंद्राला भेट देऊन प्रक्रिया पूर्ण करू शकता.

आधार कार्डच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आधार नोंदणी, सुधारणा, अपडेट फॉर्म डाउनलोड करा. 
हा फॉर्म पूर्ण भरा.

यानंतर, तुमच्या जवळच्या आधार नावनोंदणी केंद्रावर जा आणि हा फॉर्म जमा करा. 

 तुम्हाला तुमचा बायोमेट्रिक तपशील द्यावा लागतील.

यानंतर एक्झिक्युटिव्ह तुमचा लाईव्ह फोटो घेईल आणि सिस्टीममध्ये अपडेट करावं लागेल.

शेवटी, तुम्हाला 25 रुपये + जीएसटी शुल्क भरावे लागेल.