मुंबई : रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या (आरपीएफ) कॉन्स्टेबलने गुरुवारी 50 वर्षीय महिलेचे प्राण वाचवले, ही महिला मुंबईतील रेल्वे स्टेशनवर चालत्या ट्रेनमध्ये चढताना घसरली. ही घटना मुंबईच्या सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकावर घडली. आरपीएफने ट्विट केलेल्या एका व्हिडीओमध्ये, ही सगळी घटना कैद झाली आहे.
खरेतर ही महिला जेव्हा ट्रेनजवळ पोहोचली तोपर्यंत ट्रेन सुरू झाली होती. त्यामुळे या महिलेला त्या ट्रेनमध्ये चढता आले नाही, ज्यामुळे तिचा तोल गेला. परंतु तेथे जवळच उपस्थीत असलेल्या महिला आरपीएफ जवानाने वेळेत त्या महिलेला खेचले आणि ट्रेनच्या खाली जाण्यापासून वाचवले.
कॉन्स्टेबल गोलकरने वेळीच कारवाई केली नसती, तर ती महिला नक्कीच ट्रेन खाली आली असती. ही संपूर्ण घटना स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे.
RPF इंडियाने हा व्हिडीओ त्यांच्या ट्वीटर अकाउंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले #RPF CT सपना गोलकर आज तिच्या साहसाने चमकत आहे. त्यांनी सँडहर्स्ट स्टेशन, मुंबईवर चालत्या ट्रेनमध्ये चढणाऱ्या एका महिलेचा जीव वाचवला आहे."
#RPF CT Sapna Golkar shines today with her courageous act. She saved a lady who slipped while boarding a running train at Sandherst Station, Mumbai. #BeResponsible #BeSafe#HeroesInUniform@AshwiniVaishnaw@RailMinIndia @sanjay_chander @rpfcrbb @rpfcr pic.twitter.com/HOpQuK8ndT
— RPF INDIA (@RPF_INDIA) October 21, 2021
या वर्षाच्या सुरुवातीला एका पोलीस कॉन्स्टेबलने मुंबई उपनगरच्या पश्चिम मार्गावरील दहिसर रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्मच्या अंतरात पडण्यापासून एका व्यक्तीला वाचवले होते.