केजरीवालांचे सोशल मीडिया संभाळणारा मराठी तरुण 'गुजरात मॉडेल'वर म्हणतो...

 अरविंद केजरीवाल यांचे सोशल मीडिया अकाऊंट संभाळणाऱ्या टीमचे देखील यावेळी कौतुक

Updated: Feb 16, 2020, 02:09 PM IST
केजरीवालांचे सोशल मीडिया संभाळणारा मराठी तरुण 'गुजरात मॉडेल'वर म्हणतो...

नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत. या शपथविधी सोहळ्यासाठी दिल्लीकरांनी लाखोंच्या संख्येने उपस्थिती दर्शवली आहे. यावेळी अरविंद केजरीवाल यांच्यासोबत आपचे ६ नेते देखील शपथ घेत आहेत. दरम्यान निवडणूक काळात अरविंद केजरीवाल यांचे सोशल मीडिया अकाऊंट संभाळणाऱ्या टीमचे देखील यावेळी कौतुक होत आहे.

अरविंद केजरीवाल यांचे काम जगापर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्रातूनही काही तरुण दिल्लीमध्ये गेले होते. आम्ही दिल्ली मॉडेल हे जगापर्यंत पोहोचवू असे यावेळी सोशल मीडिया टीम मेंबर अभिजीत तापके याने सांगितले. 

पंतप्रधान मोदी यांनी गुजरात मॉडेल पोहोचवण्याचा प्रयत्न केला पण ते केवळ फोटोशॉपच्या आधारे होते. पण आम्ही दिल्लीचे खरे मॉडेल जगात पोहोचवू असे तापके याने सांगितले. दिल्लीमध्ये आपचे सरकार आल्यावर सोशल मीडियाच्या टीमने मनोज तिवारींच्या गाण्यावर नाचत आपला आनंद साजरा केला.