अरविंद केजरीवाल यांनी घेतली दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री

Updated: Feb 16, 2020, 12:36 PM IST
अरविंद केजरीवाल यांनी घेतली दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल यांनी आज दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून आज अरविंद केजरीवाल यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली. उपराज्यपाल अनिल बैजल यांनी त्यांनी गोपनियतेची शपथ दिली. केजरीवाल यांच्यासह मनीष सिसोदिया यांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली. सतेंद्र जैन, गोपाल राय, कैलाश गहलोत यांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली. 

अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना.

रामलीला मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडला. केजरीवाल यांच्या शपथविधी सोहळ्याला विविध क्षेत्रातली ५० मंडळी उपस्थित होती. दिल्ली पोलिसांतर्फे २ ते ३ हजार पोलिसांचा ताफा या शपथविधी सोहळ्यासाठी तैनात करण्यात आला होता. याशिवाय सीआरपीएफसह अन्य निमलष्करी दलांचे जवानही तैनात करण्यात आले होते.