एका ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे तर दुसरीकडे एसीचा वापर झपाट्याने वाढला आहे. या सगळ्यामुळे नागरिकांना भयावह अशा गरमीचा सामना करावा लागच आहे. उष्णतेमुळे घरातील तापमान कमी राहावं यासाठी मोठ्या प्रमाणात एसीचा वापर केला जात आहे. या सगळ्याचा परिणाम वातावरणावर होत आहे. मात्र हा मोठा बदल अद्याप नागरिकांच्या लक्षात आलेला नाही. याबाबत केलेल्या एका संशोधनात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
संशोधनातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. एसीचा कंप्रेसर असलेल्या छताचे तापमान आणि सामान्य छताचे तापमान मोजण्यात आलं. या दोन्ही छताच्या तापमानात 8 डिग्री सेल्सियस फरक असल्याचं जाणवलं. एका शहरात एसी लावलेल्या छताचे तापमान 49 डिग्री सेल्सियस नोंदवले आहे. तर ज्या घरात एसी नाही त्या घराच्या छताचे तापमान 41 डिग्री सेल्सियस नोंदवलं आहे. यामधील 8 डिग्री सेल्सियस फरकाला एसी जबाबदार असल्याचे समोर आले आहे.
एसीचा कंप्रेसर गरम हवेला खेचून बाहेर फेकतो. यामुळे वातावरणात उष्ण हवा सोडली जाते. ज्यामुळे घर किंवा ती खोली थंड राहते पण बाहेर गरम हवा सोडली जाते. आणि याच गरम हवेमुळे वातावरणातील तापमान वाढते. ज्यामुळे सामान्यांना त्रास होतो. तर दुसरीकडे वृक्षतोड होत असल्यामुळे तापमानात उष्णता वाढत आहे. यामुळे एसीचा वापर कमी करणे आणि वृक्षतोड केल्यामुळे या परिस्थितीवर मात मिळवली जाऊ शकते.
डिहायड्रेट होऊ शकते
तुमचा यावर विश्वास बसणार नाही, पण तज्ञ डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, जर तुम्ही जास्त वेळ एसीमध्ये बसलात किंवा तुम्हाला जास्त वेळ एसीमध्ये बसण्याची सवय लागली असेल, तर त्याचा तुमच्या आरोग्यावर नक्कीच परिणाम होतो. डॉक्टरांच्या मते एसीमध्ये जास्त वेळ राहिल्याने डिहायड्रेशन होऊ शकते. तुम्ही अनेक प्रकारच्या इन्फेक्शनलाही बळी पडू शकता.
श्वास घेण्यासही त्रास होऊ शकतो
एसी जास्त वेळ वापरल्याने श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. डॉक्टरांच्या मते, असे घडते कारण जेव्हा तुम्ही एसी चालू असलेल्या खोलीत बसता तेव्हा बाहेरून ताजी हवा त्या खोलीत प्रवेश करू शकत नाही.
रक्तदाबाचा आजार होऊ शकतो
एसीच्या थंड हवेत तासनतास बसल्याने शरीराचे तापमान कमी होते. त्यामुळे शरीरातील पेशी आणि नसा आकुंचन पावू लागतात. रक्ताभिसरण प्रभावित होते. त्यामुळे रक्तदाब सतत वर-खाली होत राहतो. आणि हळूहळू तुम्हाला कमी किंवा उच्च रक्तदाबाचा त्रास होतो.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)