ग्वाल्हेर : मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेर स्टेशनजवळ आंध्रप्रदेश एक्स्प्रेसला ही आग लागली आहे. यामुळे परिसरात धुराचे लोट पाहायला मिळत आहेत. सुरूवातीला प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आग लागल्यानंतर ही गाडी थांबवण्यात आली आहे. बिर्लानगर स्टेशनजवळची ही घटना आहे. राजधानी ही एक एसी एक्सप्रेस आहे. अजून जिवित हानी झाल्याची कोणतीही माहिती नाही. तसेच आग लागण्याचं कारणंही समजू शकलेलं नाही, अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. या एसी एक्स्प्रेसच्या चार बोगींना ही आग लागली आहे.
रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी मनोज कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, उच्च दाब असलेल्या वीजेच्या तारांच्या ठिणग्यांनी बी 6 आणि बी 7 या बोगींना आग लागली. यानंतर काही प्रवाशांनी घाबरून ट्रेनवरून उडी मारल्याने जखमी झाल्याचंही सांगण्यात येत आहे. ही आग चार बोग्यांपर्यंत पोहोचली
ही गाडी हजरत निझामुद्दीन या दिल्लीच्या स्टेशनवरून आंध्रच्या विशाखापट्टणम स्टेशनला जात होती. या अपघातानंतर अनेक रेल्वेगाड्याच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. रेल्वेने प्रवाशांच्या मदतीसाठी आपातकालीन नंबर दिला आहे. 1322, 1800111189.