देशभरात एसीबीने (ACB Raid) आतापर्यंत अनेक छापे टाकले आहेत. यामध्ये अनेक बड्या अधिकाऱ्यांच्या घरात लाखो-करोडोच्या संपत्ती सापडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यात आता नुकतच एसीबीने (ACB Raid) एका महिला कर्मचाऱ्याच्या घरी छापा टाकला होता. या महिला कर्मचाऱ्याच्या घरी टाकलेल्या छाप्यात जितकी संपत्ती मिळाली, या संपत्तीचा आकडा पाहून एसीबीचे अधिकारी देखील हैराण झाले आहेत.
माहिती तंत्रज्ञान विभागात काम करणाऱ्या एका महिला माहिती सहाय्यकाचे सुरुवातीचे मासिक वेतन 12 हजार रूपये होते. मात्र या विभागात कायमस्वरूपी झाल्यानंतर तिला दर महिन्याला 32 हजार मिळायला सुरुवात झाली. या 32 हजारातून एखादी व्यक्ती जास्तीत जास्त 5 ते 8 लाख संपत्तीचा आकडा गाठू शकते.मात्र या महिलेने या पगारातून थेट साडे 6 कोटीची संपत्ती जमवलीय. हे एकूणच विश्वास बसत नाही आहे.मात्र एसीबीच्या (ACB Raid) छाप्यात हीच बाब उघड झालीय.
एसीबीला (ACB Raid) प्रतिभा कमल यांच्याकडे बेहिशेबी मालमत्ता असल्याची माहिती मिळाली होती.या माहितीनुसार एसीबीच्या पथकाने घरावर छापा टाकला होता. या छाप्यात त्यांना साडे सहा कोटीची संपत्ती आढळली आहे. या संपत्तीचा आता स्त्रोत तपासला जात आहे.
एसीबीचे (ACB Raid) डीजी भगवान लाल सोनी यांनी या छाप्याबाबत सांगितले की, प्रतिभा कमल यांच्या दोन ठिकाणांवर बेहिशेबी मालमत्ता असल्याच्या तक्रारी मिळाल्या होत्या.या तक्रारीनुसार त्यांच्या जयपुर येथील राहत्या घरावर छापा टाकून 22 लाख 90 हजार रूपयांची रोकड जप्त करण्यात आली होती.
प्रतिभा कमल यांच्या ठिकाणांवर टाकलेल्या छाप्यात (ACB Raid) रोख रक्कमेसह अनेक गोष्टी सापडल्या आहेत. जसे दीड किलो सोन्याचे दागिने, दोन किलो चांदी, चार आलिशान कार, एक बीएमडब्ल्यू कार ,एक बीएमडब्ल्यू मोटारसायकल अशा गोष्टी सापडल्या आहेत. यासह प्रतिभा कमल आणि त्यांच्या नातेवाईकांच्या नावे 11 बँक खाती आणि 12 वीमा पॉलिसीची कागदपत्रे देखील सापडली आहेत. यासोबतच 7 दुकाने आणि 13 निवासी आणि व्यावसायिक भूखंडाची कागदपत्रेही छाप्यात हाती लागली आहेत.
दरम्यान आतापर्यंत या छाप्यात (ACB Raid) साडे 6 कोटीच्या संपत्तीची माहिती मिळाली आहे. त्यात आता एसीबीची टीम बँक खात्यांची चौकशी करणार आहे. या खात्यांमध्ये आणखी पैसै असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या संपत्तीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. तसेच या घटनेत आणखीण कोणत्या बाबी समोर येणार आहेत, हे पाहावे लागणार आहे.