Viral Video : तुरुंगातील 40 फूट भिंतीवरून मारली उडी अन् कैद्याने लंगडत लंगडत ठोकली धूम; घटना CCTV मध्ये कैद!

Karnataka Jail CCTV Video : कर्नाटकातील दावणगेरे येथील कारागृहातून एका कैद्याने पलायन केल्याची धक्कादायक घटना मागील आठवड्यात समोर आली होती. त्यानंतर आता त्याचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. 

Updated: Aug 28, 2023, 06:09 PM IST
Viral Video : तुरुंगातील 40 फूट भिंतीवरून मारली उडी अन् कैद्याने लंगडत लंगडत ठोकली धूम; घटना CCTV मध्ये कैद! title=
Karnataka Jail CCTV Video

Rape Accused Escape Karnataka Jail : चित्रपटांमध्ये खासकरून साऊथच्या सिनेमांमध्ये कैदी जेलची सेक्युरीटी तोडून पळून जातात, असं अनेकदा दाखवण्यात येतं. मात्र, वस्तुस्थितीत असं फार क्वचित पहायला मिळतं. सध्या टेकनॉलॉजीच्या काळात चोरांना कधी काय सुचेल सांगता येत नाही. असाच काहीसा प्रकार कर्नाटकमधील जेलमध्ये पहायला मिळालाय. एका कैद्याने 40 फूट उंचीची भिंत पार करून थेट पलायन केलंय. त्याचा व्हिडीओ आता सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान शेअर होत असल्याचं देखील दिसून आलं आहे.

कर्नाटकातील दावणगेरे येथील कारागृहातून एका कैद्याने पलायन केल्याची धक्कादायक घटना मागील आठवड्यात समोर आली होती. त्यानंतर आता त्याचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आता कैद्याची शोधमोहिम सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. वसंत कुमार असं या कैद्याचं नाव आहे. 23 वर्षाच्या कैद्याने नियोजन आखलं आणि जेलमधून धुम ठोकली. 

जेलच्या सुरक्षेसाठी 40 फूट उंच संरक्षण भिंत होती. कैद्याने जेलमध्ये असताना नियोजन केलं. वेळेचा फायदा उचलत त्याने भिंतीवरून उडी मारली. भिंत उंच असल्याने खाली येताना त्याचा तोल गेला. त्यानंतर त्याने लगेच पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तो लंगडताना दिसतोय. त्यावेळी रस्त्यावरील ये जा करणाऱ्या रिक्षाच्या सहाय्याने त्याने धुम ठोकली. आरोपी करूर भागातील रहिवासी असल्याने पोलिसांनी तात्काल शोध मोहिम सुरू केली. आरोपीविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता.

पाहा Video

दरम्यान, मार्चमध्ये हरियाणातील कुरुक्षेत्र जिल्हा कारागृहातून तीन कैदी फरार झाल्याची घटना घडली होती. जिथं देखभालीचं काम सुरू होतं. त्यानंतर पोलिसांनी अॅक्शन मोहिम राबवून आरोपींना अटक केली होती. त्यानंतर आता कर्नाटकातून धक्कादायक घटना समोर आली आहे.