Kangana Ranaut | 'ड्रामा क्वीन' कंगणा रनौतच्या अडचणीत वाढ, नक्की प्रकरण काय?

ड्रामा क्वीन कंगना रनौतच्या (Kangana Ranaut) अडचणीत वाढ झाली आहे. 

Updated: Jun 15, 2021, 12:18 AM IST
Kangana Ranaut | 'ड्रामा क्वीन' कंगणा रनौतच्या अडचणीत वाढ, नक्की प्रकरण काय?

मुंबई : ड्रामा क्वीन कंगना रनौतच्या (Kangana Ranaut) अडचणीत वाढ झाली आहे. कंगनाला राज्य सरकारशी पंगा घेणं महागात पडत असल्याचं दिसून येत आहे. कंगनाला सातत्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. आता कंगनाला पासपोर्ट अॅथोरिटीने तिचा पासपोर्ट रिन्यू करुन देण्यास नकार दिला आहे. (actress  drama queen kangana Ranauts difficulties increased  prevented from renewing passport actress in Bombay High Court)

पासपोर्ट अधिकाऱ्यांनुसार, कंगनावर देशद्रोहाचा खटला सुरु आहे. त्यामुळे कंगनाचा पासपोर्ट रिन्यू करता येणार नाही. यानंतर कंगनाने उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. कारण देशद्रोहाच्या खटल्याखाली उच्च न्यायलयाने कंगनाला अटक न करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात कंगनाची बहिण रंगोलीही सहआरोपी आहे.  

कंगनाच्या पासपोर्टचा व्हॅलेडिटी सप्टेंबर 2021 मध्ये संपत आहे. त्यात कंगनाला शूटिंगसाठी बुडापेस्टला जायचंय. तसेच कंगना वैयक्तिक कामांमुळे परदेशी ये-जा करत असते. पण आता तिला पासपोर्ट नुतनीकरणास नकार दिल्याने ती व्हिजासाठीही अर्ज करु शकत नाही. "मला 15 जूनला परदेशी जायचंय. त्यामुळे अधिकाऱ्यांना  पासपोर्ट नूतणीकरण करण्याचे आदेश द्यावेत", असं कंगनाने न्यायालयात म्हटलंय. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय घडणार, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.