आदित्य एल 1 अवघ्या 3 दिवसात सूर्याच्या किती जवळ? इस्रोकडून आली महत्वाची अपडेट

ISRO Sun Mission: आदित्य एल 1 याआधी 4 सप्टेंबर रोजी 245 च्या कक्षेत पृथ्वीपासून 22 हजार 459 किमी अंतरात स्थापित करण्यात आले होते.

Pravin Dabholkar | Updated: Sep 5, 2023, 11:27 AM IST
आदित्य एल 1 अवघ्या 3 दिवसात सूर्याच्या किती जवळ? इस्रोकडून आली महत्वाची अपडेट title=

Aditya-L1,Aditya L1 live:  आदित्य एल 1 संदर्भात महत्वाची अपडेट समोर येत आहे. चांद्रयान 3 च्या उत्तूंग यशानंतर आता इस्रोने आदित्य एल 1 मिशनवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. 2 सप्टेंबर रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून आदित्य एल 1 प्रक्षेपित करण्यात आले. साधारण चार महिन्यांच्या प्रवास करुन ते सूर्य आणि पृथ्वीच्या अक्षात असलेल्या L1 बिंदूवर स्थापित केले जाईल.  दरम्यान, आदित्य एल 1 दुसऱ्या उडीमध्ये 282 किमीच्या वर्तुळात 40 हजार 225 किमी अंतरावर असलेल्या कक्षेत स्थापित केले गेले आहे.

आदित्य एल 1 च्या आतापर्यंत दोन उड्या 

आदित्य एल 1 याआधी 4 सप्टेंबर रोजी 245 च्या कक्षेत पृथ्वीपासून 22 हजार 459 किमी अंतरात स्थापित करण्यात आले होते. आता पाच दिवसांनंतर म्हणजेच 10 सप्टेंबर रोजी दुपारी 2.30 च्या सुमारास ते तिसर्‍या जंपमध्ये फॉरवर्ड ऑर्बिटमध्ये ठेवण्यात येईल. आदित्य एल 1 ला शेवटी Lagrange पॉइंटवर इंस्‍टॉल केले जाणार आहे.

पहिली उडी - 245 किमी X 22459 किमी कक्षा
दुसरी उडी - 282 किमी X 40224 किमी कक्षा
तिसरी उडी - 10 सप्टेंबर रोजी नियोजित
आदित्य 15 लाख किमी अंतरावर एल 1 वर स्थापित केले जाईल.

मध्य रेल्वेत 2400 पदांवर दहावी उत्तीर्णांना संधी, लेखी परीक्षा नाही; 'ही' घ्या अर्जाची लिंक

आदित्य L1 मध्ये एकूण सात पेलोड

आदित्य एल1 मिशनमध्ये एकूण सात पेलोड्स आहेत. त्यापैकी चार सूर्यापासून निघणाऱ्या किरणांचा अभ्यास करणार आहेत. तसेच पेलोड्स एल1ला लागून असलेल्या भागांचा अभ्यास करणार आहेत. सूर्य आणि पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण एकमेकांना संतुलित करते हा तो बिंदू आहे. या बिंदूवर स्थापित होण्याचा आदित्य L1 ला फायदा होईल. इथे ग्रहणाचा प्रभाव नाही. म्हणजेच आदित्य L1 ग्रहणाच्या प्रभावाशिवाय सूर्याची हालचाल सहज समजू शकेल. आत्तापर्यंत आदित्य मिशन आपल्या गंतव्यस्थानाकडे यशस्वीपणे प्रगती करत असल्याची माहिती इस्रोने दिली आहे.

जिथं तिथं आपलीच हवा! ISRO अध्यक्षांचे फ्लाइटमध्ये 'असे' झाले स्वागत, या व्हिडिओने जिंकले मन

पहिल्या टप्प्यातलं संशोधन पूर्ण 

चंद्रावर संशोधन करणा-या प्रग्यान रोव्हरचं पहिल्या टप्प्यातलं संशोधन पूर्ण झालंय. प्रग्यान रोव्हर आता स्लीपमोडवर आहे. चंद्रावर सूर्यास्त झाल्यामुळे प्रग्यान स्लीपमोडवर गेला आहे. आता 22 सप्टेंबरला सूर्योदय होईल त्यानंतर तो पुन्हा कार्यरत होणार आहे.   प्रग्यान रोव्हरवर दोन पेलोड आहेत.  लेझर इंड्यूस्ड ब्रेकडाउन स्पेक्ट्रोस्कोप अर्थात LIBS आणि  अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर म्हणजेच APXS.  एक्स रे मशीनमुळे चंद्रावर सल्फर सापडल्याचं समजलंय. रोव्हरवर असलेल्या स्पेट्रोस्कोपनं चंद्रावर सल्फर असण्याला पुष्टी दिलीय. आता चंद्रावर हे सल्फर कुठून अस्तित्वात आलं. ज्वालामुखीमुळे, उल्कापातामुळे किंवा आणखी कुठल्या कारणामुळे चंद्रावर सल्फर आढळलं, याचा अभ्यास, शास्त्रज्ञ करणार आहेत. चंद्रावर ऑक्सिजन, आर्यन तसेच इतर खनिजे देखील सापडली आहेत.