जिथं तिथं आपलीच हवा! ISRO अध्यक्षांचे फ्लाइटमध्ये 'असे' झाले स्वागत, या व्हिडिओने जिंकले मन

Isro Chief S Somnath: इंडिगो एअरलाइन्सच्या एका एअर होस्टेसने फ्लाइटमधील प्रवाशांना इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांच्या उपस्थितीची माहिती दिली.  त्यानंतर संपूर्ण विमानात टाळ्यांच्या कडकडाट झाला

Pravin Dabholkar | Updated: Sep 2, 2023, 02:34 PM IST
जिथं तिथं आपलीच हवा! ISRO अध्यक्षांचे फ्लाइटमध्ये 'असे' झाले स्वागत, या व्हिडिओने जिंकले मन  title=

Isro Chief S Somnath: आपल्या देशात बॉलिवूड आणि क्रिकेटमधील दिग्गज यांना सेलिब्रिटी मानले जाते. चाहते त्यांना अक्षरश: डोक्यावर घेऊन नाचतात. पण वैज्ञानिक, शास्त्रज्ञांना हे प्रसंग क्वचितच अनुभवायला मिळतात. असा काहीसा प्रसंग फ्लाइटमध्ये पाहायला मिळाला. इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ हे संपूर्ण देशासाठी प्रेरणास्थान बनले आहेत. 

चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगनंतर भारतीय अंतराळ संस्था इस्रोच्या वैज्ञानिकांची जगभरात चर्चा होत आहे. इस्रोचे अध्यक्ष सोमनाथ यांचे जगभरातून कौतुक होत आहे. ते जिथे जातात तिथे त्यांचे स्वागत होतंय. 
एस सोमनाथ इंडिगोच्या फ्लाइटने प्रवास करत होते. यावेळी त्यांना फ्लाइटमध्ये पाहिल्यानंतर प्रवासी आणि विमानातील कर्मचारी आनंदून गेले. 

इंडिगो एअरलाइन्सच्या एका एअर होस्टेसने फ्लाइटमधील प्रवाशांना इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांच्या उपस्थितीची माहिती दिली.  त्यानंतर संपूर्ण विमानात टाळ्यांच्या कडकडाट झाला. एअर होस्टेसने आमच्या फ्लाइटमध्ये देशाचे राष्ट्रीय नायक उपस्थित असणे ही अभिमानाची गोष्ट आहे.

इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ आज आमच्या फ्लाइटमधून प्रवास करत आहेत. आम्ही सर्व त्याच्या उपस्थितीने खूप आनंदी आहोत आणि त्याचे स्वागत करतो. एस सोमनाथ तुमचे खूप खूप आभार, तुम्ही आमच्या फ्लाइटमध्ये आल्याचा आम्हा सर्वांना अभिमान वाटतो. यानंतर दुसऱ्या केबिन क्रूने त्यांना खास भेट दिली.

इस्रोच्या शास्त्रज्ञांनी 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6:40 वाजता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-2 यशस्वीरित्या उतरवून इतिहास रचला. आजवर कोणीही करू शकले नव्हते असा पराक्रम देशातील शास्त्रज्ञांनी केला आहे. दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. यानंतर नुकतेच आदित्य एल 1 चे सुर्याच्या दिशेने यशस्वी प्रक्षेपण झाले आहे.