आग्रा : ताजमहालबाबत उठलेल्या वादानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज आग्र्याला भेट दिली.
राज्यातल्या ऐतिहासिक वास्तू आणि महत्त्वाच्या पर्यटन स्थळांच्या विकास आणि सुरक्षेसाठी आपल्या सरकारनं व्यापक उपाययोजना केल्याचं ते यावेळी म्हणाले.
ताजमहाल परिसराच्या स्वच्छतेसाठी योगी स्वतः रस्त्यावर उतरल्याचं दिसलं. भाजपाच्या मुख्यमंत्र्यानं ताजमहालला भेट देण्याचा हा पहिलाच प्रसंग असल्यामुळे याची चांगलीच चर्चा रंगली होती.
भाजपाचे राज्यातले मंत्री आणि नेत्यांनी ताजमहालबाबत वाद उत्पन्न केल्यानंतर 'डॅमेज कंट्रोल' म्हणून योगींनी स्वतः ताजमहालला भेट देणं पसंत केल्याचं बोललं जातंय.