दिवाळीनंतर सोन्याचे दर गाठणार उच्चांकी आकडा

दिवाळीनंतर सोन्याचे दर ६० हजार रूपयांच्या घरात पोहोचतील असं देखील सांगण्यात येत आहे. 

Updated: Nov 5, 2020, 12:05 PM IST
दिवाळीनंतर सोन्याचे दर गाठणार उच्चांकी आकडा title=

नवी दिल्ली : अमेरिका राष्ट्रपती निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन यांच्यात चांगलीचं लढाई पाहायला मिळत आहे. निकाल कोणाच्याही बाजूने लागला तरी सोन्याचे दर वाढणार हे निश्चित आहे. सध्या पाहयला गेलं तर सोन्याचे आणि चांदीचे दर अस्थिर आहेत. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करावी की नको अशा पेचामध्ये ग्राहक अडकले आहेत. शिवाय सोन्याचे दर अस्थिर असल्यामुळे ऐन सणांच्या दिवसांमध्ये ग्रहकांनी सोने खरेदीकडे पाठ फिरवली आहे. तर दिवाळीनंतर सोन्याचे दर ६० हजार रूपयांच्या घरात पोहोचतील असं देखील सांगण्यात येत आहे. 

दरम्यान अमेरिकेत होत असलेल्या निवडणुकीचे पडसाद संपूर्ण जगात उमटताना दिसत आहेत. शेअर बाजार, सोने आणि मुद्रा बाजारला याचा मोठा फटका बसणार आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन या दोघांपैकी कोणीही बाजी मारली तरी सोन्याचे दर उच्चांकी आकडा गाठणार हे स्पष्ट आहे. 

goodreturns.in या वेबसाईटनुसार गुरुवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ४९९०० रुपये आहे. तर २४ कॅरेटचा भाव ५०९१० रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेटचा भाव ४९६६० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ५४१६० रुपये आहे.

मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये (MCX) सध्या सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ५१२५८ रुपये असून त्यात ४३८ रुपयांची वाढ झाली आहे. चांदीच्या किमतीत देखील ६७४ रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. आज एक किलो चांदीचा भाव ६२०६३ रुपये झाला आहे.