नवी दिल्ली : बचत खात्यावर व्याज दर कमी करण्याच्या भारतीय स्टेट बँकेच्या निर्णयानंतर आता दुसऱ्या बँकांनीही हाच मार्ग स्विकारलाय.
बँक ऑफ बडोदानं ५० लाख रुपयांपर्यंतच्या जमाराशियांवर व्याजदर अर्धा टक्का कमी करत ३.५ टक्के केलाय. शेअर बाजारांमध्ये पाठवलेल्या सूचनेत बँक ऑफ बडोदानं म्हटलंय की, ५ ऑगस्टपासून दोन स्तरीय बचत बँक व्याज दर लागू करण्याचा निर्णय घेतलाय. ५ ऑगस्टपासून बँकेत बचत खातं असणाऱ्या ग्राहकांना ५० लाख रुपयांपर्यंत जमा रकमेवर वार्षिक ४ ऐवजी ३.५० टक्के व्याज मिळेल.
५० लाख रुपयांपेक्षा अधिक जमा रक्कम असणाऱ्या ग्राहकांना चार टक्के व्याज मिळत राहील.