अटकेनंतर ती म्हणाली... “कोणी मंदिरात येऊन 'प्रसाद' देत असेल तर…”

संपूर्ण कार्यालयच लाच घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इतकंच नाही तर राज्य प्रशासनिक सेवा अधिकाऱ्याने ''मंदिरात कोणी प्रसाद घेऊन आलं असेल तर नाही कसं म्हणणार'' असं अजब उत्तर दिलंय.  

Updated: Feb 9, 2022, 05:10 PM IST
अटकेनंतर ती म्हणाली... “कोणी मंदिरात येऊन 'प्रसाद' देत असेल तर…” title=

जयपूर : राजस्थानमध्ये लाचखोरीचं एक प्रकरण समोर आलं आहे. संपूर्ण कार्यालयच लाच घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इतकंच नाही तर राज्य प्रशासनिक सेवा अधिकाऱ्याने ''मंदिरात कोणी प्रसाद घेऊन आलं असेल तर नाही कसं म्हणणार'' असं अजब उत्तर दिलंय. 

मिळालेल्या माहितीनुसार, जयपूर शहराच्या विकासाची जबाबदारी सांभाळणाऱ्या जयपूर विकास प्राधिकरणाच्या उपायुक्तांसह संपूर्ण कार्यालयातली कर्मचाऱ्यांना लाचखोरीच्या प्रकरणात पकडण्यात आलं.

लाच घेताना पकडल्यानंतर राज्य प्रशासकीय सेवेच्या अधिकारी ममता यादव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर हसत होत्या. ''जर कोणी मंदिरात प्रसाद घेऊन आलं असेल तर त्याला नाही कसं म्हणायचं'' अशी विचारणा त्या करत होत्या.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे एका व्यक्तीने जमिनीच्या व्यवहारासाठी उपायुक्त सहा लाख आणि कनिष्ठ अभियंता तीन लाख रुपये मागत असल्याची तक्रार केली होती. यानंतर अधिकाऱ्यांनी जाळं टाकलं आणि ममता यादव यांच्यासोबत कार्यालयातील सर्वांनाच लाच घेताना रंगेहाथ पकडलं.