'ब्लॅक फंगस'नंतर आला 'व्हाईट फंगस', जाणून घ्या शरीरात कसा करतो हल्ला !

देशात कोरोनाचे (Coronavirus)थैमान सुरुच आहे. कोरोनाच्या साथीमध्ये आणखी काही गोष्टींची भर पडत आहे. त्यामुळे अधिक चिंता वाढली आहे. बिहारमधील पाटण्यात नवीन प्रकार उघडकीस आला आहे.  

Updated: May 20, 2021, 12:52 PM IST
'ब्लॅक फंगस'नंतर आला 'व्हाईट फंगस', जाणून घ्या शरीरात कसा करतो हल्ला ! title=

मुंबई : देशात कोरोनाचे (Coronavirus)थैमान सुरुच आहे. कोरोनाच्या साथीमध्ये आणखी काही गोष्टींची भर पडत आहे. त्यामुळे अधिक चिंता वाढली आहे. बिहारमधील पाटण्यात नवीन प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे चिंतेत अधिक भर पडली आहे. कोरोना व्हायरस (Coronavirus) महामारी दरम्यान मध्यंतरी ब्लॅक फंगसचे (Black Fungus) प्रकार पुढे आलेत. देशात या फंगचे अनेक रुग्ण आढळून आले आहेत. आता व्हाईट फंगसचा (Four White Fungus Cases In Patna) प्रकार पुढे आला आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. बिहार (Bihar) राजधानी राजधानी पटणा (Patna) येथे व्हाईट फंगस (White Fungus) चार रुग्ण आढळून आले आहेत. या संक्रमित रुग्णांमध्ये पाटणा येथील एक प्रसिद्ध स्पेशलिस्टदेखील समाविष्ट आहे.

ब्लॅक फंगस पेक्षा धोकादायक व्हाईट फंगस

हा आजार ब्लॅक फंगसपेक्षा जास्त घातक आहे. (More Dangerous Than Black Fungus) काळ्या बुरशीच्या तुलनेत अधिक धोकादायक हा व्हाईट  फंगस आहे. व्हाईट फंगस हा कोरोनाप्रमाणे फुफ्फुसावर हल्ला करत आहे. शरीरातील अन्य भागांवर त्याचे संक्रमण होते. नख, स्किन, पेट, किडनी, मेंदू, प्राइवेट पार्ट्स आणि तोंडाच्या आत याचा संसर्ग होऊ शकतो.

येथे व्हाईट फंगसचे प्रकरण समोर आले

पाटणा येथे आतापर्यंत व्हाईट फंगसचे चार रुग्ण आढळून आले आहेत.  (White Fungus Four Patients) या चारही रुग्णांमध्ये पांढरी बुरशी दिसून आली. पीएमसीएचची मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंटचे प्रमुख डॉ. एस. एन. सिंह यांनी याबाबत माहिती दिली. 

असे होते याचे संक्रमन

त्यांनी सांगितले की, रुग्णांमध्ये कोरोनाप्रमाणे लक्षणे दिसून येत आहेत.  (Symptoms Like Corona Patients) मात्र, त्यांना कोरोना झालेला नाही. या रुग्णांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. टेस्ट केल्यानंतर समजले की हा व्हाईट  फंगसचे हे संक्रमण आहे.

दरम्यान, एक दिलासा देणारी बाब म्हणजे अँण्टी फंगल औषध दिल्यानंतर हे चारही रुग्ण आता बरे झाले आहेत. मात्र, डॉक्टरांनी सांगितले की, फुफ्फुसालाही पांढऱ्या बुरशीची लागण होते. फुप्फुसावर हल्ला करत आहे. HRCT केल्यानंतर असे दिसून आले की कोरोना प्रमाणे याचे संक्रमण दिसून येत आहे. मात्र, तो कोरोना नाही.  

डॉक्टरांचे म्हणणे आहे की एचआरसीटीमध्ये कोरोनाची लक्षणे दिसल्यास पांढरी बुरशी शोधण्यासाठी लक्षणे तपासणे आवश्यक आहे. पांढर्‍या बुरशीचे कारण म्हणजे काळी बुरशीसारखे रोगप्रतिकारशक्ती कमी होत आहे. मधुमेहाचे रुग्ण असलेल्यांमध्ये याचा धोका जास्त असतो. किंवा बराच काळ स्टेरॉयड औषधे घेत आहेत, असे डॉक्टर म्हणाले.