Crime News : लव्ह स्टोरीचा भयानक The End... कुटुंबियांनी जोडप्याचे पुतळे बनवून लावले लग्न; असं झाल तरी काय?

गुजरातमधील तापी जिल्ह्यात हा विचित्र विवाह सोहळा पार पडला. नेवाळा गावात राहणाऱ्या प्रेमी युगुलाचे प्रेम संबध त्यांच्या कुटुंबीयांना मान्य नव्हते. त्यांच्या लग्नाला घरच्यांचा लग्न विरोध होता. मात्र, अखेर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचे प्रत्यक्षात नाही तर त्यांच्या पुतळे बनवून लग्न लावले आहे. या विवाह सोहळ्याची पंचक्रोशीत चांगलीच चर्चा रंगली आहे.  

Updated: Jan 18, 2023, 11:04 PM IST
Crime News : लव्ह स्टोरीचा भयानक The End... कुटुंबियांनी जोडप्याचे पुतळे बनवून लावले लग्न; असं झाल तरी काय? title=

Gujrat Crime News : प्रेम... प्रत्येकाच्याच आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव. प्रेमात पडल्यावर जोडपी एकत्र प्रेमाच्या आणाभाका घेतात. लग्न करुन एकत्र रहाण्याचे वचन देतात. मात्र, अनेकांचे प्रेम यशस्वी होत नाही. काहीचं प्रेम इतकं अतूट असतं की मृत्यूलाही एकत्रच कवटाळतात. अशाच लव्ह स्टोरीचा भयानक The End... झाला आहे. गुजरातमधील (Gujrat) एका प्रेमी युगुलाचे अनोख्या प्रकारे लग्न झाले. त्यांच्या  कुटुंबियांनी जोडप्याचे पुतळे बनवून लग्न लावून दिले आहे. 

गुजरातमधील तापी जिल्ह्यात हा विचित्र विवाह सोहळा पार पडला. नेवाळा गावात राहणाऱ्या प्रेमी युगुलाचे प्रेम संबध त्यांच्या कुटुंबीयांना मान्य नव्हते. त्यांच्या लग्नाला घरच्यांचा लग्न विरोध होता. मात्र, अखेर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचे प्रत्यक्षात नाही तर त्यांच्या पुतळे बनवून लग्न लावले आहे. या विवाह सोहळ्याची पंचक्रोशीत चांगलीच चर्चा रंगली आहे.  

ज्यांचे पुतळे बनवून लग्न लावले त्या तरुण तरुणीचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते. मात्र, घरच्यांनी लग्नाला नकार दिला. अथक प्रयत्न करुनही कुटुंबियांनी विरोध केल्याने या दोघांनी हातात हात घेऊन एकत्रच आत्महत्या केली. हातात हात धरुन झाडाला लटकलेल्या अवस्थेत या दोघांचे मृतदेह आढळून आले होते. यामुळे गावात एकच खळबळ उडाली होती.

या दोघांच्या मृत आत्म्याला शांती मिळावी यासाठी कुटुंबियांनी त्यांचे पुतळे बनवले. या पुतळ्यांचा विवाह सोहळ्याचा घाट घालण्यात आला. आदिवासी परंपरेनुसार हा विवाह सोहळा पार पडला. अगदी थाटामाटात हा विवाह सोहळा पार पडला. दोघेही जिवंत असताना कुटुंबियांनी त्यांचे लग्न लावून दिले नाही. त्यांच्या मृत्यूनंतर आत्म्याला शांती मिळावी या भावनेतून कुटुंबियांनी लग्न लावून दिल्याचे समजते.