नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डॅनिश पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन (Mette Frederiksen) यांच्यात शनिवारी बऱ्यात मुद्द्यावर चर्चा झाली. दोन्ही बाजूंनी आरोग्य, कृषी, जल व्यवस्थापन, हवामान बदल आणि नूतनीकरणक्षम ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर सहमती दर्शविली. या संवादानंतर, पीएम मोदी म्हणाले की, भारत-डेन्मार्क ग्रीन स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप अंतर्गत झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला आणि अनेक क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या विस्तारावर चर्चा केली.
या संवादादरम्यान, दोन्ही बाजूंनी विज्ञान आणि तंत्रज्ञान, हवामान बदल आणि कौशल्य विकास या क्षेत्रांमधील चार करारांवर स्वाक्षरी झाली. पंतप्रधान मोदी म्हणाले, 'आजपासून एक वर्षापूर्वी, भारत आणि डेन्मार्क यांच्यात ग्रीन स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप स्थापन करण्याचा आम्ही ऐतिहासिक निर्णय घेतला. दोन्ही देशांमध्ये दूरगामी विचार आणि पर्यावरणाचा आदर करण्याचे हे प्रतीक आहे.
भारत आणि डेन्मार्कच्या पंतप्रधानांदरम्यान झालेल्या डिजिटल कॉन्फरन्समध्ये हरित भागीदारीचा करार झाला. अक्षय ऊर्जा, पर्यावरण, अर्थव्यवस्था आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी एक चौकट तयार करण्याचे उद्दिष्ट आहे. या संवादाला 'फलदायी' असे सांगत पंतप्रधान मोदी म्हणाले की, दोन्ही बाजूंनी सहकार्याची व्याप्ती वाढवणे आणि त्यात नवीन आयाम जोडत राहणे वचनबद्ध आहे. आम्ही आरोग्य क्षेत्रात नवीन भागीदारी सुरू केली आहे. भारतातील कृषी उत्पादकता आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आम्ही शेतीशी संबंधित तंत्रज्ञानात सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत अन्न सुरक्षा, कोल्ड चेन, फूड प्रोसेसिंग, खत, मत्स्यपालन यासारख्या क्षेत्रात तंत्रज्ञानावर काम केले जाईल.
मोदींना जगासाठी प्रेरणा असल्याचे सांगितले
यादरम्यान, डॅनिश पंतप्रधान फ्रेडरिकसन यांनी आपल्या भाषणात मोदींनी ग्रीन टेक्नॉलॉजीला प्रोत्साहन दिल्याबद्दल कौतुक केले आणि त्यांना 'जगासाठी प्रेरणा' म्हटले. "मला अभिमान आहे की जेव्हा खूप महत्वाकांक्षी ध्येये असतात, तेव्हा डॅनिश सोल्यूशन्स प्रमुख भूमिका बजावतात आणि माझा विश्वास आहे की तुम्ही उर्वरित जगासाठी प्रेरणा आहात," दहा लाख घरांसाठी स्वच्छ पाणी आणि पवन ऊर्जेसह अक्षय ऊर्जेचा विचार करता तुम्ही अनेक महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे ठेवली आहेत.
फ्रेडरिकसन म्हणाल्या की, दोन्ही पक्षांनी आरोग्य आणि कृषी क्षेत्रात सहकार्य अधिक मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे. फ्रेडरिकसन भारताच्या तीन दिवसीय दौऱ्यावर शनिवारी सकाळी नवी दिल्ली येथे पोहोचल्या. जिथे त्यांचे परराष्ट्र राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांनी स्वागत केले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी हैदराबाद हाऊसमध्ये चर्चेच्या ठिकाणी पंतप्रधान मोदी आणि फ्रेडरिक्सन यांचे फोटो शेअर केले आणि ट्वीट केले, "भारत आणि डेन्मार्क यांची हरित धोरणात्मक आघाडी प्रगती करत आहे, दोन्ही पंतप्रधानामध्ये द्विपक्षीय बैठक झाली.'
भारत आणि डेन्मार्कने 28 सप्टेंबर 2020 रोजी डिजिटल माध्यमातून आयोजित शिखर बैठकीत 'ग्रीन स्ट्रॅटेजिक अलायन्स' ची स्थापना केली होती आणि आता दोन्ही बाजू परस्पर हितसंबंधांच्या प्रादेशिक आणि बहुस्तरीय मुद्द्यांवर देखील चर्चा करतील.
फ्रेडरिकसन यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली. यानंतर, फ्रेडरिकसन यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपती भवनात स्वागत केले. जेथे डेन्मार्कच्या पंतप्रधानांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आले.