बापरे! इंजिन बदलतांना १० किलोमीटर उलटी धावली एक्सप्रेस

धक्कादायक व्हिडिओ आला समोर

shailesh musale Updated: Apr 8, 2018, 01:32 PM IST
बापरे! इंजिन बदलतांना १० किलोमीटर उलटी धावली एक्सप्रेस title=

भुवनेश्वर : अहमदाबाद-पुरी एक्सप्रेसमध्ये प्रवास करणारे प्रवाशी एका दुर्घटनेपासून बचावले जेव्हा ट्रेन इंजिन विनाच जेव्हा काही किलोमीटरपर्यंत पुढे निघून गेली. शनिवार रात्री 10 वाजण्याच्या सुमारास तितलागढ स्टेशनवर ट्रेनच्या इंजिन बदलण्याची प्रक्रिया सुरु होती. पण रेल्वे कर्मचारी डब्यांचा ब्रेक लावणं विसरुन गेला. त्या दरम्यान ही धक्कादायक घटना घडली.

इंजिन विनाच धावली ट्रेन

तितलागढ ओडिशाची राजधानी भुवनेश्वरपासून 380 किलोमीटर दूर आहे. संबलपूर रेल्वे डिविजनच्या तितलागढ स्टेशनवर ट्रेनला रोखण्यात आलं होतं आणि दुसरीकडे इंजिनचं बदलण्याचं काम सुरु होतं. त्या दरम्यान ही धक्कादायक घटना घडली. पण सुदैवाने यातून कोणतीही मोठा दुर्घटना घडली नाही. 

प्रवासी सुरक्षित

ईस्ट कोस्ट रेल्वेचे प्रवक्त्यांनी म्हटलं की, 'सगळे यात्री सुरक्षित आहे. य़ामध्ये कोणतंही नुकसान झालं नाही. जेव्हा ट्रेनच्या इंजिनला दुसऱ्या बाजुला इंजिन बदलण्यात येत होतं तेव्हा ही घटना घडली..' रेल्वे सूत्रांच्या माहितीनुसार रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ट्रेन केसिंगाकडे जाऊ लागली. इंजिनपासून जवळपास 10 किलोमीटर हे डबे असेच सरकून गेले.

व्हिडिओ

पटरीवर दगड ठेवून रोखली

रेल्वे कोचमध्ये आधीपासून सतर्क एका कर्मचाऱ्याने पटरीवर दगड ठेवला आणि ट्रेन थांबली. पुन्हा ट्रेन स्थानकावर आणली गेली. उतार असल्याने ट्रेनचे डबे इंजिनविनाच मागे सरकून गेले. या रेल्वे कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे. संबलपूरचे रेल्वे प्रबंधक (डिविजनल रेलवे मॅनेजर) जयदीप गुप्ताने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.