खासदारांना हॉस्पिटलमध्ये VVIP उपचार मिळणार नाहीत, AIIMS प्रशासनाचा मोठा निर्णय

एम्सने लोकसभा (Loksabha) आणि राज्यसभेच्या (Rajya Sabha) खासदारांच्या (Member of Parliament) उपचारांसाठी व्हीआयपी व्यवस्थेचा प्रोटोकॉल जारी केला होता.

Updated: Oct 21, 2022, 10:26 PM IST
खासदारांना हॉस्पिटलमध्ये VVIP उपचार मिळणार नाहीत, AIIMS प्रशासनाचा मोठा निर्णय title=

मुंबई :  दिल्लीतील एम्स रुग्णालयाने (AIIMS) अधिसूचना जारी करत खासदारांना व्हीव्हीआयपी उपचार देण्यासंबंधिचे आदेश मागे घेतले आहेत. एम्सने लोकसभा (Loksabha) आणि राज्यसभेच्या (Rajya Sabha) खासदारांच्या (Member of Parliament) उपचारांसाठी व्हीआयपी व्यवस्थेचा प्रोटोकॉल जारी केला होता. एम्सने 17 ऑक्टोबरला  प्रोटोकॉल जारी केला होता. झी मीडिया आणि बहुतांश डॉक्टरांच्या विरोधानंतर अखेर एम्सने माघार घेतलीय. (aiims withdraws decree on vvip treatment of member of parliment)

एम्सने प्रशासनाने वाढता विरोध पाहिल्यानंतर  लोकसभा सचिवालयाला पत्र लिहिलं. या पत्राद्वारे आम्ही खासदारांना व्हीव्हीआयपी उपचार देण्यासंबंधित आदेश मागे घेत असल्याचं एम्स प्रशासनाने सांगितलंय.  

खासदारांच्या उपचारासाठी एसओपी

एम्सने नुकतंच खासदारांच्या उपचारांसाठी एसओपी तयार केली होती. ज्यानुसार देशातील 788 खासदारांना एम्समध्ये विशेष वैद्यकीय सेवा मिळणार असल्याचं म्हटलं होतं. देशातील खासदारांना एम्समध्ये विशेष वैद्यकीय सुविधा दिल्या जातील, असे या एसओपीमध्ये स्पष्टपणे लिहिले होते. या SOP मध्ये 11 मुद्दे होते. यामध्ये खासदारांच्या सोयीसाठी एम्समध्ये विशेष कर्तव्य अधिकारी आणि हेल्पलाईन क्रमांक नमूद करण्यात आला होता.