नवी दिल्ली : जर तुम्ही नवी दिल्ली, बंगळुरू, कोची, कलकत्ता, पुणे किंवा रांचीचा प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.
एअर एशियाच्या ९९ रुपयात सुरु असलेल्या संधीचा तुम्ही फायदा घेऊ शकता.
१५ जानेवारी ते ३१ जुलैदरम्यान 'प्रमोशनल बेस फेयर' असणार असल्याचे लो-कॉस्ट कंपनी एअर एशियाने जाहीर केले. भारतातील ७ डोमेस्टिक मार्गांवर हे लागू होणार आहे. १५ जानेवारीला बुकिंग सुरू होणार असून २१ जानेवारीपर्यंत चालणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर ३१ जुलै पर्यंत प्रवासी प्रवास करु शकणार आहेत.
www.airasia.com या वेबसाईटवर मोबाईल अॅपद्वारे बुकिंग केल्यास डिस्काऊंट मिळणार आहे. एवढच नव्हे तर केवळ १,२९९ रुपयांत बंगळुरू, चेन्नई आणि भुवनेश्वर दरम्यान डायरेक्ट डेली फ्लाईटची सुविधा देण्यात आली आहे.
एअर एशिया इंटरनॅशनल फ्लाइट्सवर देखील सूट देत आहे. एशिया पॅसिफिक भागातील १० देशांसोबतच ऑकलॅंड, बाली, बॅंकॉक, कुआलालंपुर, मेलबर्न, सिंगापुर और सिडनी या देशांत १,४९९ रुपयाच बुकिंग करता येणार आहे.
ही सुविधा तुम्हाला एअर एशियाच्या प्रत्येक नेटवर्क-एअर एशिया इंडिया, एअर एशिया बरहाद, थाई एअर एशिया, एअर एशिया एक्स आणि इंडोनेशिया एअर एशिया एक्सवरदेखील उपलब्ध आहे.
भारतात या कंपनीला आपला विस्तार करायचा आहे. ही कंपनी आपली सर्व्हीस भारतात विकण्यासाठी पार्टनर शोधत असल्याचे एअरलाइन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉनी फर्नांडिसने सांगितले.