Air India New Logo Update: एअर इंडिआ एअरलाईनची मालकी टाटा समुहाकडे (TATA group) आल्यानंतर कंपनीचा लोगो बदलण्यात आला आहे. एअर इंडिया (Air India) गेल्या 15 महिन्यांपासून नव्या लोगावर (Air India New Logo) काम करत होती. कंपनीनं लोगोसह रंग आणि चिन्हंही बदललीयत. एअर इंडियाने नव्या लोगोमध्ये लाल, पांढरा रंग कायम ठेवला असून यात जांभळा रंग समाविष्ट करण्यता आला आहे.. जांभळा रंग हा एअर विस्तारामधून घेण्यात आला आहे. एअर इंडियाचा नवा लोगो नव्या युगाची नांदी असल्याचं कंपनीकडून सागण्यात आलं आहे.
टाटा ग्रुपने एअर इंडियासाठी सर्वाधिक बोली लावून कंपनी ताब्यात घेतली होती. एअर इंडिया कर्जाच्या खाईत गेली होती. टाटा ग्रुपच्या ताब्यात गेल्यानंतर एअर इंडियात (Air India) अनेक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नव्या लोगोचं अनावरण करण्यात आलं आहे. गुरुवारी झालेल्या एका भव्य कार्यक्रमात एअर इडियाने नवीन लोगो सादर केले. नवीन लोगाचं नाव 'द व्हिस्टा' असं आहे. नवीन लोगो आत्मविश्वास दर्शवतो असं टाटा सन्सचे अध्यक्ष चंद्रशेखरन यांनी म्हटलं आहे. याशिवाय एअर इंडियाच्या नवा थीम साँगचाही खुलासा करण्यात आला आहे.
महाराजा रिटायर्ड होणार?
चंद्रशेखरन यांनी दिलेल्या माहितीनुसार एअरइंडियाची ओळख असलेल्या महाराजा शुंभाकर आमच्याकडेच असून त्याला थोडा आराम दिला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार अर इंडियाच्या प्रीमियम क्लासेसमध्ये आणि विमानतळाच्या लाउंजमध्ये महाराजा दिसणार आहे. गोल चेहरा, मोठ्या मिशा, डोक्यावर भारतीय पगडी, लांब नाक आणि आकर्षक दिसणारे व्यक्तिमत्व असं महाराजाचं हे रुप गेली 77 वर्ष प्रवाशांच्या सेवेत आहे.15 महिन्यांच्या प्रवासात एअर इंडियाला सर्वोत्तम अनुभव, तंत्रज्ञान, ग्राहक सेवा आणि आत्मविश्वास निर्माण करुन जगातील सर्वोत्तम विमान कंपनी बनवायची आहे, असं चंद्रशेखरन यांनी म्हटलं आहे. गेल्या 12 महिन्यांपासून एअर इंडिआच्या सर्व कर्मचाऱ्यांना अपग्रेड केलं जात असल्याचंही चंद्रशेअखरन यांनी म्हटलंय.
लंडनच्या फ्युचर ब्रांड या कंपनीनं लोगोच डिझाईन केलंय. एअर इंडियाच्या प्रवाशांना डिसेंबर 2023 पासून विमानांवर नवीन लोगो दिसेल. एअर इंडियाचे पहिले Airbus A350 विमान नवीन लोगोसह त्यांच्या ताफ्यात सामील होणार आहे. हा ब्रँड जगभरातील अतिथींना सेवा देणारी जागतिक दर्जाची एअरलाइन बनण्याची एअर इंडियाची महत्त्वाकांक्षा ठरणार आहे.