हेल्मेट घातला नाही तरी पोलिस याला थांबवत नाहीत, पण असं का?

आता तुम्हाला हा प्रश्व पडला असेल की, हा कोणत्या तरी मंत्र्याचा मुलगा असावा किंवा कोणती मोठी व्यक्ती असावी.

Updated: Dec 26, 2021, 12:58 PM IST
हेल्मेट घातला नाही तरी पोलिस याला थांबवत नाहीत, पण असं का? title=

मुंबई : आपल्यापैकी सगळ्यांनाच वाहन चालवण्याची बऱ्यापैकी नियम माहित आहेत. त्यात आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने अगदी महत्वाचे असलेले नियम म्हणजे कार चालकांनी सिट बेल्ट लावणे आणि दुचाकी चालकाने हेलमेट घालणे. वाहन चालकांनी जर या नियमांचं पालन केलं नाही तर, त्यांचे चलान कापले जाते.  रस्त्यावर दुचाकी चालवण्यासाठी हेल्मेट घालणे बंधनकारक आहे. परंतु आज आम्ही अशा व्यक्तीबद्दल सांगणार आहोत ज्याला हेल्मेट घातला नाही तरी पोलीस त्याला कधीही थांबवत नाहीत.

आता तुम्हाला हा प्रश्व पडला असेल की, हा कोणत्या तरी मंत्र्याचा मुलगा असावा किंवा कोणती मोठी व्यक्ती असावी, ज्यामुळे त्याला अशी सवलत मिळाली असावी. परंतु असे काहीही नाही. या व्यक्तीची कहाणी थोडी वेगळी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या व्यक्तीचे नाव झाकीर मेमन असे आहे. तो गुजरातमधील छोटा उदपूर येथे राहतो. खरेतर एकदा झाकीरला हेल्मेटशिवाय दुचाकी चालवताना पोलिसांनी पाहिल्यानंतर त्यांनी त्याला थांबवले. त्याच्याकडे वाहनाशी संबंधित सर्व कागदपत्रे होती. परंतु त्याने हेल्मेट घातले नव्हते. ज्यामुळे पोलीस त्याचे चलान कापणार होते. परंतु त्यापूर्वी पोलिसांनी त्याला हेल्मेट का घातला नाही असा प्रश्न विचारा.

पोलिसांच्या प्रश्नाचं उत्तर देताना झाकीर म्हणाला, "सर मला हेल्मेट घालायचे आहे. पण कुठेही माझ्या मापाचा हेल्मेट मिळत नाही. सर माझ्या डोक्याचा आकार मोठा आहे. त्यामुळे माझ्या डोक्यात कोणतंही हेल्मेट जुळत नाही. आता मला सांगा मी काय करू शकतो. मी वाहतुकीचे सर्व नियम समजतो आणि पाळतो देखील."

झाकीरचे उत्तर ऐकून पोलीस चकित झाले. पोलिसांनी मग वेगवेगळ्या आकाराचे हेल्मेट आणले आणि झाकीरला घालायला सांगितले. परंतु त्यापैकी कोणतही हेल्मेट त्याला झालं नाही. त्याच्या डोक्याच्या आकारापुढे सगळे हेल्मेट लहान पडत होते. ज्यानंतर पोलिसांना देखील झाकीरचे म्हणणे पटले.

झाकीरने पोलिसांना सांगितले की, साहेब मी शहरात सगळ्या ठिकाणी प्रयत्न करुन झालो आहे, परंतु त्याचा काहीही फायदा झाला नाही. त्यानंतर पोलिसांनी झाकीरचं चलान न कापताच त्याला सोडून दिलं.

झाकीरची अडचण लक्षात घेऊन आणि भविष्यात त्याला होणारी अडचण लक्षात घेऊन पोलिसांनी त्याच्यासाठी हेल्मेट घालण्याच्या नियमात सवलत दिली आणि त्यासाठी पोलिसांनी त्याला प्रमाणपत्र देखील दिले. ज्यामुळे त्याला दुसऱ्या कोणत्याही पोलिसांनी पकडलं तरी त्याला ते प्रमाणपत्र दाखवता येईल.