हवेत उडणाऱ्या विमानाला झाला अपघात, Video होतोय व्हायरल

बापरे इतका मोठा अपघात, विमानातले 176 प्रवासी वाचले का? पाहा अपघाताचा हा Video 

Updated: Aug 24, 2022, 09:23 PM IST
हवेत उडणाऱ्या विमानाला झाला अपघात, Video होतोय व्हायरल  title=

मुंबई : सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये काही व्हिडिओ हे मनोरंजन करणारे असतात, तर काही व्हिडिओ हे भयंकर अपघाताचे असतात. असाच एक विमान अपघाताचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या विमानात साधारण 176 प्रवाशी प्रवास करत होते. हे प्रवाशी या अपघातात दगावले की वाचले आहेत ते जाणून घेऊयात.  

व्हिडिओत काय?
व्हायरल झालेल्या व्हिडिओत एक विमान लॅंड होताना दिसत आहे. कदाचित काही तांत्रिक कारणामुळे विमानाचे आपत्कालिन लॅंडींग करण्यात येत होते. विमानाचे लॅंडिंग होत असताना अचानक इंजिनचे कव्हर उडताना दिसते. आणि हे कव्हर उडतानाचं हे विमान लॅंड झाले. या विमानात साधारण 176 प्रवाशी प्रवास करत होते. सुदैवाने हे प्रवासी मोठ्या अपघातातून बचावले आहेत.  

अमेरिकेतील सिएटलहून सॅन दिएगोला अलास्का एअरलाइनचे हे विमान उड्डाण करत असते. उड्डाणानंतर लगेचंच विमानाला आपत्कालीन लँडिंग करावे लागले. या लॅडिंग दरम्यान विमानाचे इंजिन कव्हर हवेत उडून गेले. सोशल मीडियावर या संदर्भातला व्हिडिओ व्हायरल झाला आहे.  

एअरलाइन्सकडून निवेदन जारी
अलास्का एअरलाइन्सकडून मंगळवारी एक निवेदन जारी करण्यात आले. या निवेदनात अलास्का एअरलाइन्सने सांगितले की फ्लाइट 558 ने टेकऑफनंतर थोड्याच वेळात डाव्या बाजूला वाइब्रेशनचा अनुभव घेतला. "विमान सुरक्षितपणे टेक ऑफ करण्यात आले आहे. परंतु इंजिनला झाकणारे मेटल पॅनल, ज्याला काउलिंग म्हणतात, ते विमानापासून वेगळे झाले आहे.  

पुढे एअरलाइन्सने सांगितले की, ही घटना घडली तेव्हा विमानात 176 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्स होते. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही आणि प्रवाशांना दुसऱ्या सॅन दिएगो फ्लाइटकडे वळवण्यात आले आहे.  

दरम्यान विमानाच्या या अपघाताचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी मोठा धक्का बसला आहे.