नवी दिल्ली : अजान लाऊडस्पीकरवर होऊ नये असे इलाहाबाद सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी स्पष्ट केले आहे. अजान इस्लामचा एक अविभाज्य भाग आहे. पण लाऊडस्पीकर किंवा इतर ध्वनीक्षेपक उपकरणांच्या माध्यातून अजान सांगण याला धर्माचा भाग म्हणता येणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. प्रत्येक व्यक्तीला धार्मिक स्वातंत्र्य आहे. त्यामुळे तसेच मशिदीद्वारे सुरु असलेल्या अजानमध्ये कोणती बाधा आणू नये असे निर्देश न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला दिले आहेत.
गाजीपुरा जिल्हा प्रशासनाविरोधात उच्च न्यायलयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. यामध्ये लॉकडाऊनदरम्यान अजानवर बंदी आणण्यात आली होती. लॉऊडस्पीकरचा वापर करुन अजान ऐकण्याची परवानगी याचिकाकर्त्याने मागितली होती.
यावर जस्टिट शशिकांत गुप्ता आणि अजित कुमार यांच्या खंडपीठाने सुनावणी केली. राज्याद्वारे जाहीर केलेल्या निर्देशानुसार अशी बंदी आणता येऊ शकत नाही.
अजान इस्लामचा अविभाज्य भाग आहे. पण मायक्रोफोन आणि लाऊडस्पीकरचा उपयोग हा धर्माचा भाग मानला जाऊ शकत नसल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले.
जिल्ह्यातील लोकांना धर्माच्या आधारे संरक्षण मिळावे आणि राज्य शासनाने मशिदीत अजान किंवा नमाज वाचायला परवानगी द्यावी अस गाजीपुराचे बसपा खासदार अफजाल अंसारी यांनी आपल्या याचिकेत म्हटले होते.
यावर सर्वोच्च न्यायलयाचा निर्णय आलाय. अजान करण्यावर कोर्टाने बंदी आणली नाही पण स्पीकरचा वापर करु नये हे इलाहाबाद सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.