अमरनाथ भाविकांवर हल्ला : सत्ताधारी पीडीपी आमदाराचा ड्रायव्हर अटकेत

अमरनाथ यात्रेला गेलेल्या भाविकांच्या बसवर करण्यात आलेल्या हल्ल्याप्रकरणी जम्मू काश्मीर पोलिसांनी सत्ताधारी पीडीपी आमदाराचा ड्रायव्हर ताब्यात घेतला आहे. तौसिफ अहमद असे त्याचे नाव आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jul 15, 2017, 01:15 PM IST
अमरनाथ भाविकांवर हल्ला : सत्ताधारी पीडीपी आमदाराचा ड्रायव्हर अटकेत title=

जम्मू : अमरनाथ यात्रेला गेलेल्या भाविकांच्या बसवर करण्यात आलेल्या हल्ल्याप्रकरणी जम्मू काश्मीर पोलिसांनी सत्ताधारी पीडीपी आमदाराचा ड्रायव्हर ताब्यात घेतला आहे. तौसिफ अहमद असे त्याचे नाव आहे.

पीडीपी आमदार एजाज अहमद मीर यांच्या गाडीवर चालक म्हणून तो तैनात आहे. पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. तौसिफ अहमद असे या चालकाचे नाव असून तो पुलवामा येथे राहणारा आहे. 

अमरनाथ बस हल्ल्याप्रकरणी त्याला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या हल्ल्यात सहभागी असलेल्या आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. सोमवारी अनंतनाग येथील बटेंगू येथे भाविकांच्या बसवर झालेल्या हल्ल्यात ७ जण ठार तर २१ जण जखमी झाले होते. या महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील दोघांचा समावेश होता.

सात महिन्यांपूर्वी तौसिफला जम्मू काश्मीर पोलिसांच्या सुरक्षा दलातून हटवून आमदारांच्या गाडीवर चालक म्हणून तैनात करण्यात आले होते. तौसिफचे दहशतवाद्यांशी असलेल्या संबंधांची माहिती मिळाली असून यासंबंधीचे काही पुरावेही हाती लागले आहेत, अशी धक्कादायक माहिती पुढे आलेय.