Job News: एखाद्या खासगी कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार आणि त्यांना मिळणाऱ्या सुविधा पाहिल्या की, अनेकांचेच डोळे चमकतात. या न त्या सुट्ट्या, वीकेंडला कामाचा कमी ताण, कमालीचं प्रोफेशनल कल्चर अशा अनेक गोष्टी खासगी नोकरीमध्ये पाहायला मिळतात. पण, अशाच या खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची नोकरी आता धोक्यात आली असून, त्यांना एका क्षुल्लक गोष्टीमुळं चक्क मॅनेजरच नोकरीवरून काढू शकतो. कंपनीतील उच्चस्तरिय बैठकीमध्येच यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला असून आता त्याचा फटला अनेकांना बसू शकतो.
खासगी क्षेत्रातील आणि MNC पैकी एक असणाऱ्या Amazon नं नुकतंच कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम'ची सुविधा न देण्याचा निर्णय घेतला असून, आठवड्यातून तीन वेळा ऑफिसला न येणाऱ्या कर्मचाना नोकरीवरून काढण्याचे अधिकार मॅनेजरना देण्यात आले आहेत.
गेल्या आठवड्यातच अंतर्गत कार्यप्रणालीच्या माध्यमातून मॅनेजरना कंपनीकडून याबाबतची माहिती देण्यात आली. जिथं अॅमेझॉनकडून कर्मचाऱ्यांनी किमान तीन वेळा ऑफिसमध्ये येऊन काम करणं अपेक्षित असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. ज्या धर्तीवर मॅनेजरच्या हाती इतका मोठा निर्णय़ देण्याची अॅमेझॉनची ही पहिलीच वेळ.
पहिल्या टप्प्यामध्ये मॅनेजरनं ऑफिसमध्ये न येणाऱ्या कर्मचाऱ्यांशी मिटींगमधून संवाद साधणं अपेक्षित असेल. फॉलोअप मेलमध्ये हे संभाषण व्हावं. तरीही कर्मचाऱ्यांनी नोकरीवर येण्यास नकार दिल्यास मॅनेजरनं 'कारणे दाखवा' तत्त्वावर आणखी एक मिटींग आखावी.
मॅनेजरसोबतच्या मिटिंगही अपयशी ठरल्यास त्यानंतर या प्रकणामध्ये human resources representative ची मदत घेण्याची विचारणा करण्यात येणार असून, त्यांच्यामार्फत कर्मचाऱ्यांना लेखी इशारा (मेमो) किंवा इतर कोणत्याही पर्यायी मार्गानं नोकरीवरून काढण्याचा अंतिम इशारा दिला जाऊ शकतो.
कोरोना काळानंतर अनेक मल्टीनॅशनल कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना हायब्रिड पद्धतीनं नोकरीवर पुन्हा रुजू होण्यास सांगिललं होतं. तर, काही कंपन्यांनी पूर्ण आठवड्याभरासाठीच कर्मचाऱ्यांना नोकरीवर रुजू होण्याची विचारणा केली होती. त्याच धर्तीवर आता प्रत्येक कंपनी कमीजास्त प्रमाणात हे नियम लागू करताना दिसत आहे. अॅमेझॉनकडूनही काही महिन्यांपूर्वी कर्मचाऱ्यांसाठी देण्यात येणारी वर्क फ्रॉम होम सुविधा टप्प्याटप्प्यानं बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळालं होतं.
सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत.
...Read More|
IND
(20 ov) 161/9
|
VS |
USA
132/8(20 ov)
|
| India beat USA by 29 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
WI
(20 ov) 182/5
|
VS |
SCO
147(18.5 ov)
|
| West Indies beat Scotland by 35 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NED
(19.5 ov) 147
|
VS |
PAK
148/7(19.3 ov)
|
| Pakistan beat Netherlands by 3 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.