Amethi Murder Case : लोकांपासून आपल्या जीवाला धोका असेल तर आपण पोलिसांकडे जाऊन एफआयआर नोंदवतो. पण या एफआयआरने संपूर्ण कुटुंबाला मृत्यूचा दारात पोहोचवलं. शिक्षक पती, पत्नी आणि दोन लहान मुलांना त्या नराधमाने गोळा घालून हत्या केली. या घटनेनंतर संपूर्ण शहरात एकच खळबळ माजली.
ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील अमेठीमध्ये घडली आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार प्रेमप्रकरणातून सुखी संसार उद्ध्वस्त झालाय. चंदन वर्मा असं आरोपीचं नाव आहे. चंदनविरोधात ऑगस्टमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. चंदनचं शिक्षकाच्या पत्नीशी प्रेमसंबंध होते असं पोलिसांना तपासात समोर आलंय.
हल्लेखोरांनी कुटुंबावर सुमारे 9 राउंड गोळ्या झाडल्या आणि तेथून पळ काढला. या हत्याकांडात शिक्षक सुनील कुमार, पत्नी पूनम भारती, 4 वर्षांची मुलगी लाडो आणि दीड वर्षांची मुलगी सृष्टी यांचा मृत्यू झालाय. काही महिन्यापूर्वीच हे कुटुंब रायबरेलीमध्ये राहिला आलं होतं. सुनील सरकारी शाळेत शिक्षक असल्याने त्यांची रायबरेलीमध्ये बदली झाली होती.
18 ऑगस्ट रोजीच्या एफआयआरनुसार, पूनमने आरोप केला होता की, जेव्हा ती तिच्या मुलांचं औषध घेण्यासाठी रुग्णालयात आली होती तेव्हा चंदन वर्माने तिच्यासोबत अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी तिने नकार दिल्याने पतीने तिला मारहाण केली. तसंच जीवे मारण्याची धमकी दिली. त्या एफआयआरमध्ये पूनमने असंही लिहिलं होतं की, तिला आणि तिच्या कुटुंबाला काही झालं तर त्याला चंदन वर्मा जबाबदार असतील. यातूनच हा खून झाला आहे का, याचा तपास सुरू असल्याचे सध्या पोलीस अधिकारी सांगत आहेत.
मृत शिक्षक सुनीलची पत्नी पूनम आणि आरोपी चंदन वर्मा यांचं प्रेमसंबंध होते. आरोपी बुलेट चालवून रायबरेलीहून अमेठी शहरात एकटाच आला होता. घटनेपूर्वी तो भवानी धामच्या दर्शनासाठी गेला. दर्शन घेतल्यानंतर आरोपी शिक्षकाच्या घरी पोहोचला आणि त्याने गोळ्या झाडून संपूर्ण कुटुंबाची हत्या केली.
पोलिसांनी आरोपी चंदनच्या व्हॉट्सॲपवरून खुलासा केला की, त्याने 12 सप्टेंबरला माझ्याबद्दल 5 जणांचा मृत्यू होईल असे लिहिले होते. म्हणजेच शिक्षक सुनील कुमार, त्याची पत्नी पूनम आणि दोन मुलींची हत्या केल्यानंतर चंदनलाही आत्महत्येची इच्छा होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे शिक्षकाच्या पत्नीशी प्रेमसंबंध होते. त्यांच्या नात्यात काही काळ दुरावा आला होता. यामुळे त्याने ही हत्या केली होती.अमेठी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्याची चौकशी सुरू आहे.
ही हत्या करणारा मुख्य आरोपी चंदन वर्मा चकमकीत जखमी झाला आहे. आरोपी पोलीस कर्मचाऱ्याचे पिस्तूल हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना ही चकमक झाली. यावेळी त्याच्या पायाला गोळी लागल्याची घटना मोहनगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. यूपी एसटीएफने शुक्रवारी खुनी चंदन वर्माला नोएडा जेवार टोल प्लाझा इथून अटक केली आहे.