अमूल, मदर डेअरी दुधाच्या किंमतीत वाढ

डेअरी उत्पादन कंपनी अमूल आणि मदर डेअरीने शनिवारी दिल्ली-एनसीआरसह देशातील इतर शहरांतही दूधाचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 

Updated: Dec 15, 2019, 08:35 AM IST
अमूल, मदर डेअरी दुधाच्या किंमतीत वाढ  title=

नवी दिल्ली : डेअरी उत्पादन कंपनी अमूल आणि मदर डेअरीने शनिवारी दिल्ली-एनसीआरसह देशातील इतर शहरांतही दूधाचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. वाढलेले दर १५ डिसेंबरपासून लागू करण्यात आले आहेत. अमूलने २ रुपये प्रतिलीटर दूधाच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तर मदर डेअरीने किंमतीत ३ रुपये प्रतिलीटर वाढ केली आहे.

अमूल दुधाची गुजरात, दिल्ली एनसीआर, पश्चिम बंगाल, मुंबई, महाराष्ट्र, अहमदाबाद आणि सौराष्ट्र बाजारांत १५ डिसेंबरपासून वाढलेल्या दराने दूध विक्री केली जाणार आहे. नवीन दरांनंतर अहमदाबादमध्ये अमूल गोल्डची किंमत २८ रुपये प्रति ५०० मिलीलीटर आणि अमूल ताजाची किंमत २२ रुपये प्रति ५०० मिलीलीटर इतकी झाली आहे. अमूल शक्तीच्या दरांत कोणताही बदल करण्यात आलेला नसून ते २५ रुपये प्रति ५०० मिली दराने उपलब्ध आहे. 

यावर्षी २१ मे रोजी गुजरात सहकारी दूध विपणन महासंघाने राष्ट्रीय राजधानी दिल्ली, महाराष्ट्र आणि इतर राज्यात दुधाचे दर वाढवले होते.

मदर डेअरीने ३ रुपयांपर्यंत दुधाच्या किंमती वाढवल्या आहेत. ४० रुपये प्रति लीटर विकणारं मदर डेअरीचं बुल्क मिल्डेड मिल्क ४२ रुपये प्रति लीटर झालं आहे. ५३ रुपये प्रति लीटर फुल क्रिम मिल्क आता ३ रुपयांनी वाढून ५५ रुपये प्रति लीटर झालं आहे. ४२ रुपये लीटर मदर डेअरीच्या टोन्ड मिल्कची किंमत ४५ रुपये झालीये. 

याआधी मदर डेअरीने मे २०१९ मध्ये दुधाच्या किंमतीत प्रति लीटर २ रुपयांची वाढ केली होती.