अन आनंद महिंद्रांना दिसले 'एलियन' ..

महिंद्रा अ‍ॅन्ड महिंद्रा या कंपनीचे एमडी आणि चेअरमॅन आनंद महिंद्रा हे नाव व्यवसाय क्षेत्रामध्ये प्रसिद्ध आहे.

Updated: Nov 12, 2017, 11:20 AM IST
अन आनंद महिंद्रांना दिसले 'एलियन' ..

 मुंबई : महिंद्रा अ‍ॅन्ड महिंद्रा या कंपनीचे एमडी आणि चेअरमॅन आनंद महिंद्रा हे नाव व्यवसाय क्षेत्रामध्ये प्रसिद्ध आहे.

व्यवसायिक वर्तुळाप्रमाणेच ट्विटरवर सक्रिय असल्याने अनेक नेटकर्‍यांचे त्यांच्या ट्विटकडे लक्ष असते. 
 आज सकाळी व्हॉट्सअ‍ॅपवरील एक व्हिडिओ पाहून त्यांनी केलेलं ट्विट तुम्हांला थोडं अचंबित करू शकतं. कारण आनंद महिंद्रा यांनी 'एलियन' पाहिल्याचं ट्विट केलं आहे.  

 
 काय आहे हा प्रकार ? 
 रविवारी (आज) सकाळी सूर्यनमस्कार करण्यापर्यंत मी स्वतःवर खूप खूष होतो. मात्र व्हॉट्सवरील एक व्हिडियो पाहून मी पाहिलेल्या या दोन व्यक्ती परग्रहावरून आलेले एलियनच असावेत. असा माझा समज आहे. 
 
 आनंद महिंद्रा हे व्यक्तिमत्त्व गंभीर वाटत असले तरीही ट्विटरवर मात्र त्यांचा ह्युमर आणि हटके अंदाज अनेकदा पहायला  मिळाला आहे. त्यांनी यापूर्वीही अनेक मजेशीर ट्विट्स आणि व्हिडिओ पोस्ट केले आहेत. त्यांच्या या अंदाजामुळे सोशल मीडियामध्येही आणि ट्विटरवरही खास आहेत. त्यांचे फॉलोवर्सदेखील त्यांना ट्विटरवर मजेशीर सल्ले देतात.