प्रतीक्षा संपली! लोकसभा निवडणुकांची उद्या घोषणा, इतक्या टप्प्यांत मतदान होणार?

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकांच्या तारखा अखेर उद्या जाहीर होणार आहेत. निवडणूक आयोगाची उद्या दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद असून उद्यापासून आचारसंहिता लागू होणार आहे. 

राजीव कासले | Updated: Mar 15, 2024, 01:29 PM IST
प्रतीक्षा संपली! लोकसभा निवडणुकांची उद्या घोषणा, इतक्या टप्प्यांत मतदान होणार? title=

Loksabha 2024 : आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज लोकसभा निवडणकी संदर्भातली. लोकसभा निवडणुकीच्या तारखा उद्या जाहीर होणार आहेत. उद्या दुपारी 3 वाजता निवडणुक आयोगाची (Election Commission) पत्रकार परिषद आहे. या पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) तारखा जाहिर केल्या जातील. त्यानंतर देशतात आचारसंहिता (Code of Conduct) लागू होईल. दिल्लीत आज निवडणूक आयोगाची बैठक पार पडली.. या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबत आढावा घेण्यात आला. यंदा 7 ते 8 टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे.

निवडणूक आयुक्तांची नियुक्ती
गुरुवारी दोन नव्या निवडणूक आयुक्तांची निवडण करण्यात आली होती. त्यानंतर आज निवडणूक आयुक्त सुखबीर संधू आणि ज्ञानेश कुमार यांनी आपल्या कार्यभार सांभाळला. मुख्य निडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दोघांचं स्वागत केलं.  सकाळी अकरा वाजता निवडणूकीच्या तारखांबाबत महत्त्वाची बैठक पार पडली. त्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्तांनी शुक्रवारी दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद होणार असल्याची माहिती दिली. या पत्रकार परिषेदेत लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली जाणार आहे. 

लोकसभेच्या एकूण 543 जागा आहेत. गेल्या म्हणजे 2019 लोकसभा निवडणुकीत भाजपाने 303 जागा पटकावल्या होत्या. तर काँग्रेसला केवळ 52 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. यावेळी भाजपचं नेतृत्व असलेल्या एनडीए आणि विरोधकांच्या इंडिया आघाडीत मुख्य लढत असणार आहे. 

गेल्यावेळी 7 टप्प्यात मतदान
2019 मध्ये लोकसभा निवडणूक सात टप्प्यात घेण्यात आली होती. गेल्या वेळी 10 मार्चला निवडणूक आयोगाने तारखांची घोषणा केली होती. पहिल्या टप्प्यातील मतदान 11 एप्रिल आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान 19 मे 2019 रोजी झालं होतं. तर 23 मे रोजी मतमोजणी झालीहोती. त्यावेळी देशात 91 कोटीहून अधिक मतदार होते, यातले 67 टक्के मतदान झालं होतं.

2019 चे निकाल
201४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 282 जागा जिंकल्या होत्या. तर 2019 मध्ये भाजपने तीनशेचा टप्पा पार करत 303 जागा पटकावल्या होत्या. तर एनडीएने 353 जागा मिळवल्या होत्या. आता भाजपने चारशेहून अधिक जागांचं लक्ष्य ठेवलं आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या तारखाही जाहीर होणार
लोकसभा निवडणूक 2024 तारखांबरोबरच काही राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखांचीही घोषणा होण्याची शक्यता आहे. ओडिशा, सिक्किम, अरुणाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेशमध्ये निवडणूका होणार आहेत.