जहानाबाद : दिल्लीच्या शाहीनबागमध्ये भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी पोलिसांनी अखेर शरजील इमामला अटक केली आहे. गुन्हे शाखेने जहानबादच्या काको पोलीस स्टेशन परिसरातून शरजील इमामला अटक केली आहे. शरजील इमामच्या अटकेसाठी बिहारमधील पाटणा आणि जहानबादमधील त्याच्या वडिलोपार्जित गावातही छापा मारण्यात आला. याआधी सोमवारी शरजील इमामच्या लहान भावालाही ताब्यात घेण्यात आले होते.
त्याचबरोबर बिहार पोलिसांनी शरजील इमामच्या तीन नातेवाईकांना अटक केली आहे. त्यांना नंतर वैयक्तिक जातमुचक्यावर सोडण्यात आले. शरजील इमाम याच्यावर पाच राज्यात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
Breaking news । दिल्लीच्या शाहीनबागमध्ये भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी पोलिसांनी अखेर शरजील इमामला बिहार येथून अटक केली आहे. https://t.co/dNmVe4G9Pp pic.twitter.com/KfrKa9G1kE
— ZEE २४ तास (@zee24taasnews) January 28, 2020
शरजील इमाम यांच्यावर देशद्रोह आणि भडकावू भाषण देण्याचा गंभीर आरोप लावण्यात आला आहे. तसेच त्याच्यावर दंगली माजविण्याचाही आरोप आहे. तसेच दिल्लीमध्ये उत्तर प्रदेश पोलिसांनी शरजीलच्या शोधासाठी अनेक ठिकाणी छापे टाकले. त्याच्यावर आसाम, उत्तर प्रदेश, दिल्ली, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूर येथे त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शरजील इमामच्या आईने तो निर्दोष असल्याचे म्हटले आहे. न्यायालय आणि अल्लाह यांच्यावर आपल्या विश्वास असल्याचे त्या म्हणाल्यात. आपल्या मुलाचे विधानाची तोडफोड करण्यात आली आहे. ते चुकीच्या पद्धतीने प्रसिद्ध केले गेले असून आपल्या कुटुंबाला त्रास दिला जात असल्याचा आरोप तिच्या आईने केला आहे. तो काही चोर नाही. तो लवकरच समोर येईल, असे त्याच्या आईने म्हटले आहे.