नवी दिल्ली : 2DG Price कोरोना रुग्णांवर उपचारासाठी नुकतेच DRDOने 2DG औषध निर्माण केले आहे. त्या औषधाची किंमत डॉ. रेड्डीज लॅबने निर्धारित केली आहे. फार्मा कंपनीने 2DG ची किंमत 990 रुपये ठेवली आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. की, 2DG औषध सरकारी रुग्णालयांमध्ये कमी किंमतीला (2DG Price) उपलब्ध असेल. केंद्र आणि राज्य सरकारांना कमी किंमतीत उपलब्ध केले आहे. या औषधाचे प्रोडक्शन डॉ. रेड्डीज लॅबकडून करण्यात येत आहे. ड्रग कंन्ट्रोलर जनरल ऑफ इंडियाने या औषधाला एमरजन्सी वापरासाठी परवानगी दिली आहे. 2DG ही ओरल ऍंटी कोविड औषध आहे. याला डॉक्टरांच्या सल्ल्यााने कोरोना मॉडरेट आणि गंभीर रुग्णांसाठी दिले जाऊ शकते.
एँटी कोरोना औषध 2 DG ला DRDO आणि डॉ. रेड्डीज लॅबसोबत मिळून बनवण्यात आले आहे. हे औषध जूनच्या मध्यापर्यंत बाजारात उपलब्ध होणार आहे. सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये देखील या औषधाचा सप्लाय सुरू होणार आहे.
या औषधाचा शोध DRDO चे इंन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर मेडिसिन ऍंड एप्लाइड सायंन्सच्या वरिष्ठ वैज्ञानिकांनी लावला आहे. हे औषध ग्लुकोजच्या रुपात असून कोरोना विषाणूच्या ऊर्जेला नष्ट करते. तसेच विषाणूला निष्क्रीय करते. त्याचे डॉ. रेड्डीज लॅबमध्ये उत्पादन सुरू आहे. हे औषध ब्रेन ट्युमरच्या उपचारासाठी वापरण्यात येत होते. ते कोरोनावर देखील प्रभावी आहे.