Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची काही दिवसांपूर्वीच जामिनावर तुरुंगातून सुटका झाली होती. तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांनी रविवारी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे. आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी ही घोषणा केली असून त्यांनी पुढील दोन दिवसात आपण राजीनामा देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दिल्लीच्या आम आदमी पार्टीच्या मुख्यालयात आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. यावेळी त्यांनी आपण दोन दिवसांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याचे म्हंटले. जो पर्यंत जनता त्यांचा निर्णय देत नाही, तो पर्यंत मी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसणार नाही असे म्हटले आहे. केजरीवाल म्हणाले, 'मी प्रत्येक घर आणि गल्लीबोळ्यात जाईन. जोपर्यंत जनतेचा निर्णय मिळत नाही तो पर्यंत मुख्यमंत्रीच्या खुर्चीवर बसणार नाही'.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुढे म्हटले, "काही लोक म्हणतात की सुप्रीम कोर्टने लावलेल्या निर्बंधांमुळे मी काम करू शकत नाही. त्यांनीही आमच्यावर निर्बंध लादण्यात कोणतीही कसर सोडली नाही. जर तुम्हाला वाटत असेल की मी प्रामाणिक आहे, तर मला मोठ्या संख्येने मतदान करा. निवडून आल्यानंतरच मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसेन. फेब्रुवारीमध्ये निवडणुका होणार आहेत, पण महाराष्ट्राच्या निवडणुकांबरोबरच नोव्हेंबरमध्ये इथेही निवडणुका घ्याव्यात, अशी माझी मागणी आहे. निवडणुका होईपर्यंत पक्षातील दुसरा कोणीतरी मुख्यमंत्री होईल. येत्या दोन-तीन दिवसांत आमदारांची बैठक होणार असून, त्यात पुढील मुख्यमंत्र्यांबाबत निर्णय घेतला जाईल".
#WATCH | Delhi: CM Arvind Kejriwal says, "... I am going to resign from the CM position after two days. I will not sit on the CM chair until the people give their verdict... I will go to every house and street and not sit on the CM chair till I get a verdict from the people..." pic.twitter.com/6f7eI7NVcN
— ANI (@ANI) September 15, 2024
अरविंद केजरीवाल यांनी बैठकीत म्हंटले की, " आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी देवाचे खूप आभार. आपण सर्व समस्यांवर ताबा मिळवत असून आपल्याला दुश्मनांसोबत लढण्यात यश मिळत आहे. आपण फक्त एक छोटासा पक्ष आहोत ज्याने या देशाचं राजकारण बदललं. यासाठी मी देवाचे आभार मानतो. त्यांचे षड्यंत्र आपलं आत्मविश्वास तोडू शकत नाहीत, आम्ही पुन्हा तुमच्यामध्ये आहोत. आम्ही असेच देशासाठी लढत राहू, आम्हाला फक्त तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याची गरज आहे.
|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.