नवी दिल्ली : दिल्लीमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीने कंबर कसली आहे. शनिवारी सकाळी आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक महत्वाची घोषणा केली आहे. निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांची कंपनी एपॅक आता आम आदमी पक्षासाठी काम करणार आहेत.
उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया अरविंद केजरीवाल यांचे ट्विट रिट्विट केले. प्रशांत किशोर हे देशातील प्रसिद्ध निवडणूक रणनितीकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत काम केले आहे. किशोर यांनी काँग्रेससाठी देखील काम केले आहे.
आयपॅकने देखील आपल्या ट्वीटर अकाऊंटवर एक ट्वीट केले आहे. यामध्ये त्यांनी अरविंद केजरीवाल यांना टॅग केले आहे. 'पंजाबच्या निवडणुकीनंतर आम्हाला हे समजले की आप सर्वोत मोठा विरोधी पक्ष आहे. ज्यांचा आपण सामना केला. तुमच्यासोबत काम करण्याचा आनंद आहे, असे ट्वीटमध्ये म्हटले आहे.
महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने एकत्र निवडणुका लढवल्या. पण दोन्ही पक्षांनी केलेला दावा फोल ठरला. दोन्ही पक्षाच्या जागा कमी झाल्या. शिवसेनेच्या एकूण शिवसेनेसाठी यंदा रणनीती आखणारे प्रशांत किशोर यांच्यावर पक्षातील नेते नाराज आहेत. किमान ७५ आमदार निवडून आणण्याचा I-pac चा उद्देश होता. त्यामुळे यापुढे प्रशांत किशोर यांची संस्था I-Pac ला यापुढे आदित्य ठाकरे यांच्यासाठी काम करण्याची जबाबदारी काढून घेतली जावू शकते.
निवडणुकीचा निकाल आल्यानंतर प्रशांत किशोर यांच्या संस्थेत काम करणाऱ्या व्यक्तींसोबत आदित्य ठाकरेंनी चर्चा केली. पण सूत्रांच्या माहितीनुसार, आदित्य ठाकरे हे देखील I-Pac च्या कामावर नाराज असल्याचं बोललं जातं आहे.