दिल्लीत रेशनची होम डिलीव्हरी होणार, महाराष्ट्रात हे शक्य आहे का ?

घराघरामध्ये रेशन योजनेस मंजुरी देण्याचा मोठा निर्णय

Updated: Jul 21, 2020, 03:21 PM IST
दिल्लीत रेशनची होम डिलीव्हरी होणार, महाराष्ट्रात हे शक्य आहे का ? title=

नवी दिल्ली : घराघरामध्ये रेशन योजनेस मंजुरी देण्याचा मोठा निर्णय दिल्लीच्या केजरीवाल सरकारने घेतलाय. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेत याबद्दल माहिती दिली. ही योजना झाल्यानंतर लोकांना रेशन दुकानांवर जावे लागणार नाही. गरीबांना घरपर्यंत रेशन पोहोचवण्याचा निर्णय झालाय. दिल्लीत दरमहा साधारण ७२ लाख जणांना रेशनची सुविधा मिळते. या पार्श्वभुमीवर आता महाराष्ट्रातील ठाकरे सरकारही असा निर्णय घेईल का असा प्रश्न उपस्थित होतोयं. 

ही योजना सुरु झाल्यानंतर लोकांना रेशन पाठवलं जाईल. त्यांना रेशन दुकानावर येण्याची गरज नसेल. हे एक क्रांतिकारक पाऊल आहे. गरिबांना सन्मानाने रेशन मिळावं अशी माझी अनेक वर्षांपासून इच्छा होती, जी आज पुर्ण झाल्याचे मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले. ज्या दिवशी दिल्लीत मुख्यमंत्री घर-घर रेशन योजना सुरु होईल त्याच दिवशी दिल्लीत केंद्र सरकारची वन नेशन वन रेशन कार्ड योजना लागू केली जाईल असेही ते म्हणाले. 

दुकानामध्ये जाऊन रेशन घ्यायचं की घरामध्ये रेशन मिळावं हे पर्याय दिल्लीकरांसमोर असणार आहेत. होम डिलीव्हरी अंतर्गत गहूच्या ऐवजी पीठ दिले जाईल. ६ ते ७ महिन्यात ही योजना सुरु होण्याची शक्यता आहे.