6 महिन्यात 1 लाख नोकऱ्या, बेरोजगारांना 5 हजार रुपये भत्ता; उत्तराखंडसाठी AAP चे आश्वासन

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हल्द्वानी दौऱ्यात उत्तराखंडच्या जनतेसाठी मोठे आश्वासन दिले आहे

Updated: Sep 19, 2021, 02:51 PM IST
6 महिन्यात 1 लाख नोकऱ्या, बेरोजगारांना 5 हजार रुपये भत्ता; उत्तराखंडसाठी AAP चे आश्वासन title=

चंदीगड : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हल्द्वानी दौऱ्यात उत्तराखंडच्या जनतेसाठी मोठे आश्वासन दिले आहे. आम आदमी पार्टीने उत्तराखंडसाठी रोजगाराबाबत आश्वासन दिले आहे. प्रत्येक घराला रोजगार दिला जाईल. सत्ता आल्यास 6 महिन्यात 1 लाख सरकारी नोकऱ्या दिल्या जातील. असे न झाल्यास 5 हजार रुपये महिना भत्ता दिला जाणार आहे.

केजरीवाल यांनी निवडणुक आश्वासनांमध्ये आरक्षणाचाही उल्लेख केला आहे. त्यांनी म्हटले की, राज्याच्या नोकऱ्यांमध्ये 80 टक्के स्थानिकांना आरक्षण मिळेल. केजरीवाल यांनी म्हटले की, दोन दशकांपासून सत्ता गाजवणाऱ्या पक्षांनी राज्याची दुर्दशा केली आहे. डोंगर, जंगल आणि जमीन सर्वांची लूट केली आहे. आम्ही 21 वर्षांची ही दुर्दशा सुधारण्याच्या तयारीत आहोत.

आम आदमी पक्षाच्या उत्तराखंड युनिटने पहाडी प्रदेशच्या मतदारांना मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले आहे. दिल्ली प्रमाणे 24 तास वीज तसेच 300 युनिटपर्यंत फ्री वीज देण्याचे आश्वासनही केजरीवाल यांनी दिले आहे.