प्रशासनाला जे जमलं नाही ते वाघाने करून दाखवलं

आज ते गाव हगणदारी मुक्त

Updated: Dec 3, 2019, 01:04 PM IST
प्रशासनाला जे जमलं नाही ते वाघाने करून दाखवलं title=

मुंबई : उत्तर प्रदेशात बुंदेलखंडच्या महोबा आणि हमीरपुर जिल्ह्यातील सीमेवरील दोन गावांत वाघ घुसला आहे. ज्यामुळे गावकरी घरांमध्येच घाबरून बसले आहेत. एवढंच काय तर उघड्यावर शौचासही घराबाहेर पडत नाहीत. हमीरपुर आणि महोबा जिल्ह्याला खूप अगोदरच ओडीएफ म्हणजे हगणदारी मुक्त गाव म्हणून घोषित केलं आहे. मात्र तरी देखील गावकरी उघड्यावर शौचाला जाणं पसंत करतात. 

जिल्हाप्रशासनाच्या असंख्य प्रयत्नांनंतरही गावकरी उघड्यावर शौचाला जात अशतं. 21 नोव्हेंबरला अचानक एक दिवस वाघ हमीरपूर आणि महोबा जिल्ह्यातील सीमेवर डरकाळी फोडताना दिसला. डरकाळीचा आवाज ऐकून गावकऱ्यांना स्वतःला घरातच कैद केलं. एवढंच नव्हे तर गावकरी आता शौचालयास देखील उघड्यावर बसत नाहीत. (माकडांना अद्दल घडवण्यासाठी कुत्र्यालाच केलं वाघ)

महोबा जिल्ह्यातील डीएफओ रामजी राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा वाघ एक वयस्कर रॉयल बंगाल टायगर आहे. जो मध्यप्रदेशच्या जंगलात भटकताना दिसतो. तो अनेकदा शेतांमधून जातो. नुकताच तो कुनेहटा गावातील युवराज सिंहच्या शेतातून गेल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं. यामुळे महोबासोबतच हमीरपुर गावातही वन विभागाची टीम वाघाला पकडण्यासाठी सज्ज आहे. महोबात वाघाचं येणं हे एका आश्चर्याशिवाय काही कमी नाही. गेल्या अनेक दिवसांपासून वन विभागाची टीम वाघाला पकडण्यासाठी जंगलातच ठाण मांडून आहे. मात्र अद्याप कुणालाही यश मिळालेलं नाही. (जॉगिंग ट्रॅकच्या झाडीत बिबट्याचं दर्शन) 

युवराज सिंह यांच्या माहितीनुसार, वाघाच्या भीतीने गावकरी घराबाहेरच काय? तर शौचालयाला देखील घराबाहेर पडत नाही. त्यामुळे गावाच्या भीतीेने का होईना गावकरी घरातील शौचालयाचा वापर करू लागले आहे. काही वर्षांपूर्वीच हगणदारी मुक्त म्हणून घोषित केलेले गाव खऱ्या अर्थाने 'हगणदारीमुक्त' झाले आहे.