एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसींचं वादग्रस्त विधान

असदुद्दीन ओवेसी हे हैदराबादमध्ये शुक्रवारी रात्री एका जाहीर सभेत बोलत होते, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 23, 2017, 08:38 PM IST
एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसींचं वादग्रस्त विधान title=

हैदराबाद : 'जेव्हा आम्ही हिरवा रंग परिधान करु, तेव्हा सर्व ठिकाणी हिरवाच रंग दिसेल. आमच्या हिरव्या रंगासमोर कुठलाही रंग टिकणार नाही. आमच्या रंगासमोर ना मोदींचा रंग, ना काँग्रेसचा रंग… कोणताचा रंग टिकणार नाही. फक्त हिरवा रंग पाहाल', असे वादग्रस्त विधान एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केले आहे.

असदुद्दीन ओवेसी हे हैदराबादमध्ये शुक्रवारी रात्री एका जाहीर सभेत बोलत होते, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.

मुस्लिम मतदारांचं धुव्रीकरण

मुस्लिम मतदारांचं धुव्रीकरण करुन ते निवडणुका जिंकू शकतात. पण अशाने आपली लोकशाही कमकुवत होईल. जाणीवपूर्वक मुस्लिमांचा राजकीय प्रभाव कमी करणे हे चांगले नाही असंही ओवेसी यावेळी म्हणाले.

भाजपा आणि काँग्रेस

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी मुस्लिम मतांमध्ये रुची दाखवली नाही, यावरून ओवेसी बोलत होते.