Funny Video: 'अशोक गेहलोत I Love You', राजस्थान कर्मचारी संघटनेच्या रॅलीत मजेशीर नारा

Ashok Gehlot Rally : प्रेमात आपण  I Love You म्हटलेलं ऐकलं आहे. पण चक्क एका रॅलीमध्ये I Love You चा नारा गुंजला. झालं असं की,..

Updated: Oct 16, 2022, 03:49 PM IST
Funny Video: 'अशोक गेहलोत I Love You', राजस्थान कर्मचारी संघटनेच्या रॅलीत मजेशीर नारा title=
Ashok Gehlot I Love You Funny Video viral on Social media nmp

Ashok Gehlot I Love You: राजकीय नेत्यांच्या रॅलीमध्ये आपल्याला अनेक वेगवेगळे नारे ऐकायला मिळतात. जय श्रीरामचे नारे, एकच पेन्शन, जुनी पेन्शनचा नारा, खलिस्तान जिंदाबादचे नारे आणि पाकिस्तान जिंदाबाद असे नारे ऐकले आहेत. एखाद्या नेत्याचा समर्थनात जर रॅली निघाली असेल तर त्या नेत्याचा नावाने नारा दिला जातो. पण सध्या सोशल मीडियावर (Social media) एक मजेदार व्हिडीओ (Funny Video) पाहिला मिळतं आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. 

गेहलोत पुन्हा एकदा प्रकाशझोतात

राजस्थानमधील राजकीय गदारोळानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शनिवारी राहुल गांधी यांची भेट घेतली आणि यादरम्यान दोघांमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. ते राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेतही सहभागी झाले. अशातच अशोक गेहलोत एका वेगळ्या गोष्टीवरुन पुन्हा एका प्रकाशझोतात आले आहेत. 

रॅलीत चक्क गुंजला I Love You चा नारा

प्रेमात आपण  I Love You म्हटलेलं ऐकलं आहे. पण चक्क एका रॅलीमध्ये I Love You चा नारा गुंजला. झालं असं की, राजस्थान (Rajasthan) कर्मचारी संघटनेच्या रॅलीत मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Chief Minister Ashok Gehlot) या समर्थकांनी जोरदार नारेबाजी केली. एका वेळेनंतर समर्थकांना आता कुठला नारा द्यायचा याचा प्रश्न पडला आणि मग काय...एका समर्थकाने चक्क 'अशोक गेहलोत I Love You' चा नारा दिला. (Ashok Gehlot I Love You Funny Video viral on Social media nmp)

घोषणेचा व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर हा मजेदार नारा तुफान व्हायरल होतो आहे. ही घटना फेब्रुवारी 2022 (February 2022) मध्ये घडली होती. सोशल मीडिया असं प्लेटफॉर्म आहे जिथे एखाद्या जुना व्हिडीओ पण कधीही व्हायरल होऊ शकतो. तसंच काहीस या व्हिडीओसोबत झालं आहे. 'अशोक गेहलोत I Love You' या घोषणबाजीचा व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहिला जातो आहे.