close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

आसाम राज्यात शॉपिंग मॉलबाहेर स्फोट, सहा जण जखमी

आसामची राजधानी गुवाहाटीमध्ये एका शॉपिंग मॉलबाहेर झालेल्या स्फोटात सहा जण जखमी झालेत. 

Updated: May 15, 2019, 10:36 PM IST
आसाम राज्यात शॉपिंग मॉलबाहेर स्फोट, सहा जण जखमी

गुवाहाटी : आसामची राजधानी गुवाहाटीमध्ये एका शॉपिंग मॉलबाहेर झालेल्या स्फोटात एक ठार तर सात जण जखमी झालेत. रात्री ८च्या सुमारास वेळी शहराच्या मध्यवर्ती भागात बाईकवरून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी हातबॉम्ब फेकला. पोलीस महासंचालक कुलंदर साईकिया यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. श्रद्धांजल कानन पार्क या प्रसिद्ध बगिचाशेजारीच हा शॉपिंग मॉल आहे. संध्याकाळच्या वेळी या भागात पर्यटकांची गर्दी असते. सर्व जखमींना रुग्णालयात हलवण्यात आल्याचे गुवाहाटीचे पोलीस आयुक्त दीपक कुमार यांनी सांगितले.