close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

अटल पेन्शन योजना, १० हजार प्रति महिना होणार पेन्शन?

केंद्र सरकार अटल पेन्शन योजना घेतलेल्या लोकांसाठी खुशखबर घेऊन येत आहे. मोदी सरकारच्या या योजनेंतर्गत मिळणाऱ्या मासिक पेन्शनच्या रकमेत वाढ करुन ही रक्कम १० हजार होऊ शकते.

Updated: Jun 13, 2018, 05:08 PM IST
अटल पेन्शन योजना, १० हजार प्रति महिना होणार पेन्शन?

नवी दिल्ली : केंद्र सरकार अटल पेन्शन योजना घेतलेल्या लोकांसाठी खुशखबर घेऊन येत आहे. मोदी सरकारच्या या योजनेंतर्गत मिळणाऱ्या मासिक पेन्शनच्या रकमेत वाढ करुन ही रक्कम १० हजार होऊ शकते. ही मर्यादा १० हजारांवर नेण्याचा विचार सरकार करतेय. सध्या ही मर्यादा ५ हजार रुपये आहे. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीच्या एका कार्यक्रमात डिपार्टमेंट ऑफ फायनान्शिअल सर्व्हिसेसमधील जॉईंट सेक्रेटरी मदनेश कुमार मिश्रांनी याबाबत माहिती दिली.

ते म्हणाले, या योजनेंतर्गत पेन्शनची रक्कम प्रति महिना १० हजार करण्याचा प्रस्ताव सरकारला पाठवण्यात आला आहे. याबाबत सरकार विचार करत आहे. याला दुजोरा देताना पीएफआरडीएचे चेअरमेन हेमंतजी म्हणाले, सबस्क्रायबर्स बेस वाढवण्यासाठी हा प्रस्ताव सरकारला पाठवण्यात आला आहे.

हा आहे सध्या स्लॅब

हेमंतजी पुढे म्हणाले, सध्या अटल योजनेंतर्गत पेन्शनचे ५ स्लॅब आहेत. १ हजारापासून ते  ५ हजार रुपयांदरम्यान हे स्लॅब आहेत. पेन्शन रेग्युलेटरला सामान्य माणसांकडून सल्ले मिळाले. या सल्ल्यामध्ये पेन्शन वाढवण्याची शिफारस करण्यात आली होती.

पेन्शन रक्कम वाढवण्याच्या प्रस्तावासोबतच पीएफआरडीएने दोन आणखी नवे प्रस्ताव सरकारला पाठवलेत. यात वयोमर्यादा ५० पर्यंत वाढवण्याचीही मागणी केलीये. सध्या अटल पेन्शन योजना सुरु करण्यासाठी वयोमर्यादा १८ ते ४० वर्षे इतकी आहे. मात्र ही वयोमर्यादा ५० पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव सरकारला पाठवण्यात आलाय. या योजनेमध्ये १.०२ कोटी लोक जोडली गेलीत.