ऍटलस कंपनी मालकाच्या पत्नीची आत्महत्या

आत्महत्येपूर्वी सूसाईट नोटमध्ये असं काही लिहीलं की  

Updated: Jan 23, 2020, 05:57 PM IST
ऍटलस कंपनी मालकाच्या पत्नीची आत्महत्या

नवी दिल्ली : ऍटलस कंपनीचे मालक संजय कपूर यांच्या पत्नीने २१ जानेवारी रोजी राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली आहे. नताशा कपूर असे त्यांच्या पत्नीचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना घटनास्थळी सापडली आहे. या चिठ्ठीमध्ये त्यांनी कुटुंबाला काळजी घेण्यास सांगितली आहे. तर कोणालाही जबाबदार ठरवलेलं नाही. 

'मी असं काही केलं आहे जे मी करायला नको होतं. त्यामुळे माला फार वाईट वाटतं आहे.' अशा आशयाची चिठ्ठी लिहीत त्यांनी आपला जीवन प्रवास संपवला आहे. पोलिसांना ही चिठ्ठी सापडल्यानंतर तात्काळ चौकशीला सुरूवात केली. तर या चौकशीत त्या नैराश्यामध्ये नव्हत्या किंवा त्यांना कोणत्याही प्रकारचा शारीरिक आजार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

नवी दिल्लीत औरंगजेब मार्गावरील ल्युटयेन येथील घरामध्ये नताशा कपूर मंगळवारी मृतावस्थेत सापडल्या. त्यानंतर तात्काळ त्यांना गंगाराम रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तपासल्यानंतर मृत घोषित केले.
त्यानंतर त्यांचा देह शवविच्छेदनासाठी आरएमएल रूग्णालयात नेण्यात आला. 

त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. नताशा यांचा मृत्यू अनैसर्गिक असला तरी, पोलिसांनी कोणावरही संशय व्यक्त केलेला नाही. तर याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.