सलूनमध्ये काम करणाऱ्या 'या' मुलीला पाहून व्हाल थक्क

सस्मिता हे काम मुलगा बनून करतेय...  

Updated: Jan 23, 2020, 03:37 PM IST
सलूनमध्ये काम करणाऱ्या 'या' मुलीला पाहून व्हाल थक्क title=

ओडिशा : ज्या वयात मुली शिक्षण घेतात...लग्नाची स्वप्न बघतात, त्या वयात एक मुलगी अशी आहे, जी मुलगा बनून सलूनमध्ये लोकांचे केस कापण्याचं काम करतेय. या मुलीचं नाव सस्मिता बारीक असं आहे. विशेष बाब म्हणजे ही मुलगी स्वातंत्र्य सेनानी नखी भण्डारुणि यांची पणती आहे.

कटक जिल्ह्यातील सालेपुरपासून १० किमी दूर असणाऱ्या बहुग्राम गावात राहणाऱ्या सस्मिताला सर्व जण काली नावाने ओळखतात. सस्मिताने तिच्या आईच्या निधनानंतर शिक्षण सोडलं आणि आर्थिक जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. काली तिच्या वडिलांसोबत गेल्या सात वर्षांपासून केस कापण्याचं काम करतेय.

स्वातंत्र्य सैनिक नखी भण्डारुणि घरां-घरातून न्हाव्याचं काम करत होत्या. त्यावेळी गांधीजींची पदयात्रा सुरु होती. १९३४ मध्ये महात्मा गांधी हरिजन पदयात्रेदरम्यान सालेपुर गावात थांबले होते. सर्व जण इंग्रजांना घाबरत होते. त्यामुळे गांधींजींची दाढी करण्यासाठी कोणताही न्हावी मिळत नव्हता. ही गोष्ट नखी भण्डारुणि यांना समजली त्यावेळी महिला असूनही त्या न घाबरता गांधींजींकडे पोहचल्या. त्यावेळी कोणत्याही महिलेने न्हाव्ह्याचं काम करणं ही गोष्ट तितकीशी मान्य करण्याजोगी नव्हती. 

गांधीजी नखी भण्डारुणि यांच्यामुळे प्रभावित झाले. गांधींजींनी त्यांनाही स्वातंत्र्याचा मंत्र दिला आणि सैनिकांसाठी काही दान देण्यासाठीही सांगितलं. त्यावेळी नखी भण्डारुणि यांनी काही दागिने आणि पैसे दान केले. त्यानंतरही नखी आपल्या भोजनासाठी पैसे ठेऊन, बाकी पैसे दान करत होत्या. त्या न्हाव्ह्याच्या कामासह सर्वांना स्वातंत्र्याबाबत जागरुक करत होत्या. याच महिलेची पणती सस्मितादेखील न्हाव्ह्याचं काम करते. पण सस्मिता हे काम मुलगा बनून करते.