एटीएम कार्डची माहिती गुप्त ठेवूनही 3.42 लाख खात्यातून गायब

एटीएम किंवा क्रेडिट कार्डची माहिती सुरक्षित ठेवा असा सल्ला सतत दिला जातो. मात्र ग्वालियरमधील एका जवानाने कधीच त्याचे एटीएम डिटेल्स शेअर केले नाहीत, ओटीपीची माहिती इतरांना दिली नाही तरीही कोणताही संदेश न देता 27 दिवसात 3.42 लाख रूपये काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. 

Updated: May 27, 2018, 06:02 PM IST
एटीएम कार्डची माहिती गुप्त ठेवूनही  3.42 लाख खात्यातून गायब title=

मुंबई : एटीएम किंवा क्रेडिट कार्डची माहिती सुरक्षित ठेवा असा सल्ला सतत दिला जातो. मात्र ग्वालियरमधील एका जवानाने कधीच त्याचे एटीएम डिटेल्स शेअर केले नाहीत, ओटीपीची माहिती इतरांना दिली नाही तरीही कोणताही संदेश न देता 27 दिवसात 3.42 लाख रूपये काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. 

कोणताच मेसेज नाही 

27 दिवसामध्ये या आर्मी जवानाच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावर कोणताच मेसेज आलेला नाही. ही घटना 28 फेब्रुवारी ते 26 मार्च दरम्यान घडल्याची माहिती उघड झाली आहे. याप्रकरणी तक्रार नोंदवण्यात आली आहे. 

एटीएम क्लोनिंगचा अंदाज 

मलखान सिंह राठोर हा क्लर्क आहेत. जबलपूरमध्ये ते कार्यरत आहेत. त्यांचा पगार ग्वालियरच्या पंजाब नॅशनल बॅंकेमध्ये जमा होतो. मार्च महिन्याच्या अखेरीस ते सुट्टी घेऊन घरी परतले होते. 27 मार्चला त्यांनी बॅंकेतून काही पैसे काढले. त्यावेळेस पावती पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.  3.42 लाख रूपये त्यांच्या अकाऊंटमधून गेल्याचे त्यांना समजले. याप्रकरणी एफआरआय दाखल केलेली असून हा प्रकार एटीएम कार्डाच्या क्लोनिंगद्वारा करण्यात आलेला आहे. असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.