बाबरी मशिद होती आणि राहील, असदुद्दीन ओवेसींचं ट्वीट

एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसींचं ट्वीट

Updated: Aug 5, 2020, 09:42 AM IST
बाबरी मशिद होती आणि राहील, असदुद्दीन ओवेसींचं ट्वीट  title=

नवी दिल्ली : अयोध्येत राम मंदिर भुमिपुजनाच्या सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते हे भुमिपूजन होणारेय. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर वादग्रस्त जागा राम मंदिरासाठी देण्यात आली. देशभरात या सोहळ्याची चर्चा होत असताना मुस्लिम लॉ बोर्डने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. आता एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी देखील यात उडी घेतलीय. 

बाबरी मशिद होती आणि राहीलं असे ट्वीट असदुद्दीन ओवेसी यांनी केलंय. या ट्वीटनंतर युजर्सनी ओवेसींवर निशाणा साधलाय.   

बाबरी मशिद होती आणि कायम राहील असे ऑल इंडीया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डने आपल्या अधिकृ ट्वीटर हॅंडलवरुन म्हटलंय. हागिया सोफिया याचे मोठे उदाहरण आहे. अन्यायकारक, लाजिरवाणा, एकतर्फी निर्णयाद्वारे जमीनीवर होणारे पुनर्निमाण इतिहास बदलू शकत नाही. दु:खी होण्याची गरज नाही. कोणतीही स्थिती कायम राहत नाही. असे मुस्लिम लॉ बोर्डने म्हटलंय. 

पुन्हा मशिदीत रुपांतरीत झालेली हागिया सोफिया ही १५०० वर्ष जुनी वास्तू जागतिक वारसामध्ये रुपांतरीत झालीय. जुलै महिन्यामध्ये टर्कीचे राष्ट्रपती रेचेप तैय्यब एर्दोगन यांनी ऐतिहासिक म्युझियम पुन्हा मशिदीत बदलण्याचे आदेश दिले. १४३४ मध्ये इंस्ताबुलवर हल्ला केल्यानंतर उस्मानीशाहीने मशिदीत बदललेल्या हागिया सोफियाला एक म्युझियम बनवले. या ऐतिहासिक वास्तूमध्ये अनेक बदल झाले. जेव्हा ही इमारत बनली तेव्हा भव्य चर्च होती. त्यानंतर हे मशिदीत रुपांतरीत झाली राष्ट्रपती एर्दोगन यांनी १९३४ मध्ये हा ऐतिहासिक निर्णय बदलला.

सहाव्या शतकातील चर्च

हागिया सोफिया जगातील सर्वात मोठ्या चर्चमधील एक आहे. ही सहाव्या शतकात बायजेंटाइन सम्राट जस्टिनियनने बनवले होते. त्यावेळी हे शहर कुस्तुनतुनिया किंवा कॉन्सटेनटिनोपोल नावाने ओळखले जायचे. इ.स ५३७ मध्ये या वास्तूला चर्च बनवण्यात आलं. 

भूमिपूजनासाठी एकूण 175 लोकांना श्री राम मंदिर ट्रस्टकडून आमंत्रण देण्यात आलं आहे. देशाच्या विविध भागातून येणाऱ्या जवळपास 135 संतांचा समावेश आहे. प्रत्येक आमंत्रण पत्रिकेवर सुरक्षेच्या दृष्टीने एक कोड बनवण्यात आला आहे.